ETV Bharat / state

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर ट्रकच्या ब्रेकमध्ये बाटली अडकल्याने झाला अपघात

author img

By

Published : May 3, 2021, 9:42 PM IST

मुंबई-पुणे जुन्या महामार्गाने लोणावळाहून खोपोलीकडे ट्रक जात असताना ब्रेकमध्ये बाटली अडकल्याने ट्रकचा ब्रेक लागला नाही. यामुळे झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ

रायगड (खालापूर) - मुंबई-पुणे जुन्या महामार्गाने लोणावळाहून खोपोलीकडे ट्रक जात असताना ब्रेकमध्ये बाटली अडकल्याने ट्रकचा ब्रेक लागला नाही. यामुळे झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा जागीतच मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर ट्रकच्या ब्रेकमध्ये बाटली अडकल्याने झाला अपघात

याबबात सविस्तर वृत्त असे की, पुण्याहून मुंबईकडे जाणारा ट्रक नो एंट्रीमार्गे खोपोलीकडे जात असताना तो दस्तूरी येथील अवघड वळणावर अंडा पॉईंट जवळ आला असता ट्रकच्या ब्रेकमध्ये पाण्याची बाटली अडकल्याने ट्रकचा लागला ब्रेक नाही. त्यामुळे ट्रक समोरील कठड्याला जोरदार धडकली. यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, अपघातग्रस्त पथक, देवदूत यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ट्रकमधील अडकेल्या चालकाला बाहेर काढण्यात मदत केली.

हेही वाचा - रेमेडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.