ETV Bharat / state

Truck And Car Accident Raigad: दोन अपघातात चौघांचा मृत्यू; ट्रक आणि कारची समोरा-समोर धडक

author img

By

Published : Feb 19, 2023, 10:58 PM IST

राज्यात रविवारी घडलेल्या दोन अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला. पेण-खोपोली मार्गावर वाक्रुळ येथे आज सायंकाळी ट्रक आणि इकोची समोरा-समोर जोरदार धडक झाली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यात भरधाव कार दुकानात शिरल्याने एकाचा मृत्यू झाला.

Truck And Car Accident Raigad
अपघात

Truck And Car Accident Raigad
Truck And Car Accident Raigad

पेण (रायगड): अपघाताचे सविस्तर वृत्त असे की, इको कार क्रमांक (एमएच-46-ए-1003) मधून बाळूमामाच्या यात्रेसाठी कोल्हापूरच्या दिशेकडे चालले होते. तर ट्रक क्रमांक (एमएच-43-बीजी-3234 ) हा खोपोलीहून पेणकडे येत होता. पेण पूर्व विभागातील वाक्रुळ गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरा-समोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की, त्यामध्ये इकोकार मधून प्रवास करणारे विक्रम गोविंदराव दिंडे (वय 50), नागेश विक्रम दिंडे (वय 27 वर्षे, चालक) आणि प्राजक्ता नागेश दिंडे (वय 25 वर्षे) हे जागीच ठार झाले. तर याच कारमधील गजानन चंदन वडगावकर (वय13), विकी विठ्ठल श्रीरामे (वय 15), मीनाक्षी विक्रम दिंडे ( वय 22), कविता विक्रम दिंडे (वय 45) हे गंभीर जखमी झाले आहेत.


जखमींना रुग्णालयात केले दाखल: अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी, युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तर अपघातग्रस्तांचे मदतगार देवदूत कल्पेश ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळी पोहचत अपघातग्रस्तांना मदत करीत स्वतःच्या रुग्णवाहिकेतून जखमींना पेणमधील सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल केले. यामुळे तीन जखमींचे प्राण वाचू शकले. वृत्त समजताच वाक्रुळ येथे राहणारे माजी आमदार धैर्यशील पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.

दिंडे परिवारावर संकट: या अपघातातील दिंडे परिवार हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे पेणमधील फणसडोंगरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. दरवर्षी ते कोल्हापूर जिल्ह्यातील बाळुमामाच्या यात्रेसाठी जात असतात. यंदाही यात्रेसाठी निघाले असतानाच त्यांच्या परिवारावर हे मोठे संकट कोसळले. अपघाताचे वृत्त पेण फणसडोंगरी परिसरात पोहोचताच दिंडे परिवाराशी संबंधितांनी शोक प्रकट केला.


वाहतुक कोंडी हटविली: या अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्याला करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत. या अपघातामुळे पेण-खोपोली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला केल्यावर ही वाहतूक पूर्ववत सुरू झाली. काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक आपटा-रसायनी-पनवेल मार्गे वळविण्यात आली होती.

दुकानात शिरली भरधाव कार: औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वसु सायगाव येथे नागपूर मुंबई मार्गावर असलेल्या फरसाणच्या दुकानात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भरधाव कार क्रमांक mh 12 kj 1510 दुकानात शिरली. या अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. अपघातात तीन दुचाकीचाही चुराडा झाला आहे.


कारच्या धडकेत तरुण व्यावसायिक ठार: कार दुकानात शिरल्याने दुकानातील तरुण व्यवसायिक रोहित किशन पवार हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मावळली. तर अपघातात इतर तीन जण जखमी झाले असून चार दुचाकीचा चुराडा झाला आहे.


पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात: घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलीस कर्मचारी हनुमंत सातपुते, विनोद पवार, अक्षय साळुंखे ,बाबा शेख आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत.

अपघातात कंटेनर फुटला अन्: रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 4 ब वर 26 नोव्हेंबर, 2022 रोजी अपघात झाला. पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक जाम झाल्याचे पहायला मिळाले. अपघातामध्ये कंटेनर फुटून केमिकल रस्त्यावर पसरल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नातून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

कंटेनर फुटल्याने केमिकल रस्त्यावर: दोन कंटेनर ट्रेलरमध्ये झालेल्या अपघातामध्ये केमिकल वाहून नेणारा कंटेनर फुटल्याने केमिकल रस्त्यावर पसरले. ज्यामुळे या मार्गवरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली. घटनास्थळी वाहतूक पोलीस, अग्निशमन डाळ दाखल झाले असून, जेएनपिटीकडे हाणाऱ्या मार्गवरून दुतरफा वाहतूक सुरु करण्यात आली होती.


हेही वाचा: Mumbai Crime: 'तो' करायचा महिलांना अश्लील व्हिडिओ कॉल; व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवायचा प्रायव्हेट पार्टचे फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.