ETV Bharat / state

सोबत आलेल्या व्यक्तीने पळविले दोन वर्षाचे बाळ, घटना सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Aug 2, 2021, 8:11 PM IST

Updated : Aug 2, 2021, 8:27 PM IST

बाळाला पळवताना
बाळाला पळवताना

खोपोली शहरात सध्या पुराच्या संकटातून सावरत असताना अनेक वेळा चोरीच्या घटना कानावर येत आहेत. मात्र, रविवारी चक्क खोपोली नगरपालिका रुग्णालयाच्या आवारातून आई वडीलाबरोबर आलेल्या दोन वर्षाच्या लहानग्याला त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीने पळवल्याची घटना घडली आहे.

रायगड - खोपोली शहरात सध्या पुराच्या संकटातून सावरत असताना अनेक वेळा चोरीच्या घटना कानावर येत आहेत. मात्र, रविवारी चक्क खोपोली नगरपालिका रुग्णालयाच्या आवारातून आई वडीलाबरोबर आलेल्या दोन वर्षाच्या लहानग्याला त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीने पळवल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या व्यक्तीचा खोपोली पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही

लहानग्याचा शोध सुरुच

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधीक माहिती अशी की, खोपोली शिळफाटा येथील मुळगाव धनगरवाडा येथे वास्तव्यात असणारे सोमनाथ आप्पा घाटे व त्याची पत्नी लहान 2 वर्षांचा मुलगा समर्थ हे कुटुंब 10 दिवसांपूर्वी औरंगाबादेतील कामाच्या ठिकाणाहून आले होते. त्यांच्या सोबत एक त्याठिकाणी ओळख झालेला व्यक्ती गजा हा देखील खोपोली येथे येऊन वास्तव्य करत होता. रविवारी सोमनाथ यांच्या पत्नीच्या पोटात दुख असल्याने पती-पत्नी, लहान मुलगा समर्थ व त्याच्या सोबत आलेला गजा हे सर्वजण रिक्षाने खोपोली शहरात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी आले. त्यांचा दोन वर्षाचा मुलगा समर्थ त्याच्याबरोबर आलेल्या गजाकडे होता. काही वेळानंतर गजाने या समर्थला घेऊन पळ काढला. काही वेळाने ही बाब सोमनाथ घाटे यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने आपल्या दोन वर्षाच्या समर्थचा शोध घेतला. मात्र, तो कोठेच सापडला नाही.

सीसीटीव्हीत सर्व प्रकार कैद

सोबत आलेल्या गजाने मुलाला पळवल्याचा टाहो फोडल्याने या ठिकाणी अनेक नागरिक जमा झाले. त्यानंतर ही बाब खोपोली पोलिसांना कळविल्याने तात्काळ रुग्णालयात येऊन माहिती घेतली. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात गजानेच मुलाला घेऊन जाताना दिसत आहे.

आईची प्रकृती चिंताजनक

मुलाला नेल्याच्या घटनेमुळे आईची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने तिच्यावर खोपोली पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, हरवलेल्या समर्थचा अद्याप शोध लागला नाही. त्यामुळे खोपोली पोलीस बिट मार्शल, दामिनी पथक व सामाजिक कार्यकर्त्यांचे पथक त्याचा शोध घेत आहे.

हेही वाचा - मोटार मॅकेनिक टीमकडून पूरग्रस्तांना अशीही मदत.. पाणी अन् चिखलामुळे बंद पडलेली वाहने निशुल्क करून दिली दुरुस्त

Last Updated :Aug 2, 2021, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.