ETV Bharat / state

Raigad Accident : पुलावरुन सुसाट कार कोसळली धावत्या रेल्वेवर; तीन ठार, दोघे जखमी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 5:50 PM IST

Updated : Nov 7, 2023, 7:23 PM IST

Raigad Accident : रायगड जिल्ह्यात आज पहाटे 3 च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात रिपाईं नेत्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. कर्जत किरवली पुलावरून ही कार खाली पडली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Raigad Accident
Raigad Accident

कारचा भीषण अपघात

नवी मुंबई Raigad Accident : रायगड जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे. या अपघातात रिपाईं नेत्यासह तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कर्जत किरवली पुलावरून इनोव्हा कार जात असताना कार खाली कोसळली.


कशी घडली घटना : रिपाईं नेते तसंच नेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले धर्मानंद गायकवाड त्यांच्या परिवारासोबत मंगळवारी पहाटे त्यांच्या कारनं प्रवास करत होते. पहाटे सव्वातीनच्या सुमारास त्यांची इनोव्हा कार मुंबईहून कर्जत कल्याण मार्गावरुन नेरळच्या दिशेनं येत होती. त्यांची कार किरवली पुलाजवळ आल्यानंतर धर्मानंद गायकवाड यांचा कारवरील ताबा सुटला. त्यानंतर इनोव्हा कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पुलाची सुरक्षा रेलिंग तोडून खाली रेल्वे मालगाडीवर कोसळली.

जेसीबीच्या मदतीनं पाच जणांना काढलं बाहेर : मालगाडीवर कार आदळल्यानंतर मालगाडी तिथंच थांबवण्यात आली. त्याचवेळी रेल्वे प्रशासनानं तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, कारमधील पाच जणांना बाहेर काढलं. त्यानंतर त्यांना तातडीनं कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी धर्मानंद गायकवाड (40), नितीन जाधव (35, मुंबई), मंगेश जाधव (30, मुंबई) यांना मृत घोषित केलं. या अपघातात जखमी झालेले पत्रकार जयवंत हाबळे (44) संतोष जाधव (38) यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा बळी : धर्मानंद गायकवाड यांनी नेरळ ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. गेल्या चार वर्षांपासून ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होते. ते आरपीआय आठवले गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम पाहात होते. गेली 22 वर्षे ते पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. मंगेश जाधव, नितीन जाधव हे धर्मानंद गायकवाड यांचे मामा असून तिघांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.


हेही वाचा -

  1. Agra Accident : मुलीला ट्रेनमध्ये बसवल्यानंतर डॉक्टर पित्याचा काही वेळेतच रेल्वे रुळावर मृत्यू, नेमका अपघात कसा झाला?
  2. Bihar Boat Accident : शरयू नदीत बोट उलटून किमान ४ जणांचा मृत्यू, १४ बेपत्ता
  3. Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेश रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे अपघाताचं सांगितलं 'हे' कारण, मृतांचा आकडा 14 वर पोहोचला!
Last Updated : Nov 7, 2023, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.