उरणमध्ये सापडला मृतदेह; खुनाचा संशय

author img

By

Published : Aug 29, 2021, 6:50 PM IST

uran

उरण तालुक्यातील प्रसिद्ध द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी घनदाट जंगलामध्ये एका 45 वर्षीय तरुणांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याची खबर करंजा गावच्या सरपंचांना समजताच तात्काळ पोलीसांना खबर देण्यात आली.

उरण - करंजा येथील जंगलामध्ये एका तरुणांचा मृतदेह आढळून आला असून, प्रथमदर्शी खुनाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी पोहचून तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे. इसमाची ओळख पटली नसून, पोलीस मृतामागचे कारण शोधत आहेत.

uran
खुनाचा संशय

खून झाल्याचा अंदाज
उरण तालुक्यातील प्रसिद्ध द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी घनदाट जंगलामध्ये एका 45 वर्षीय तरुणांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याची खबर करंजा गावच्या सरपंचांना समजताच तात्काळ पोलीसांना खबर देण्यात आली. यावेळी इसमाची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर हा प्रकार खुनाचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत पुढील तपास उरण बंदर विभागाचे उपायुक्त सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

लोकवस्तीपासून दूर असणाऱ्या ठिकाणी घडली घटना
मृतदेह सापडलेले ठिकाण हे जंगल विभाग असून, येथे मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. तर हे ठिकाण लोकवस्तीपासून खूप दूर आहे. यामुळे हे ठिकाण अशे गुन्हे करण्यासाठी वापरण्यात येते. मात्र या प्रकारांना आला घालण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याने असे गुन्हे घडण्यास चालना मिळते आहे.

हेही वाचा - मित्रांच्या एकाधिकारशाहीवर देश बोलतोय; मन की बातवरून राहुल गांधींचा निशा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.