5G launched in Maharashtra: पनवेल येथील पोदी शाळेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ

author img

By

Published : Oct 1, 2022, 2:35 PM IST

5G service launched in Maharashtra

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेल मध्ये 5G सेवेचा शुभारंभ केला. (5G in Maharashtra). या निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे पनवेल येथील पोदी शाळेत उपस्थित होते.

नवी मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे 5G सेवेचा शुभारंभ केला (5G launched in India) असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महाराष्ट्रातील पनवेल येथील शाळेत 5G सेवेचा शुभारंभ केला. (5G in Maharashtra). महाराष्ट्रात ही सेवा सुरू करण्यासाठी राज्यातील तीन शाळांची निवड करण्यात आली होती. त्यात पनवेल महापालिकेतील पोदी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेचा समावेश होता. यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोदी शाळेत उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला

5G service launched in Maharashtra
5G service launched in Maharashtra
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.