ETV Bharat / state

Girl Sexually Assaulted : १९ वर्षीय तरुणाचा ५ वर्षीय मुलीवर लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

author img

By

Published : Dec 9, 2022, 11:23 AM IST

Updated : Dec 9, 2022, 1:14 PM IST

तळोजा येथे ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार ( 5 yr old girl sexually assaulted ) करण्यात आला. इमारतीच्या लिफ्टमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी अरोपीला पकडले आहे.

Physical abuse
Physical abuse

रायगड : जिल्ह्यातील तळोजा येथे मोहम्मद अख्तर मथर हुसेन या १९ वर्षीय तरुणाने ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार ( 5 yr old girl sexually assaulted ) केला. मुलीला खेळत असताना आरोपीने लिफ्टमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी आल्यानंतर तिला उलट्या होऊ ( girl started vomiting ) लागल्या. तिच्या आईने विचारल्यानंतर, तिने हा प्रकार उघडकीस आणला. तिच्या पालकांसह शेजारी बाहेर जमले. त्यांनी आरोपीला पळून जाण्यापूर्वीच पकडले, पीडित मुलीने त्याला ओळखल्याचे पोलिसांनी (19 year old accused arrested ) सांगितले.

लिफ्टमध्ये गैरकृत्य : नवी मुंबईतील तळोजा फेज -1 येथील एका इमारतीच्या आवारात लैंगिक अत्याचाराची घटना घडली. आरोपी अख्तर हा एसी रीपेरिंगचं काम करण्यासाठी आला होता. तो काम करुन खाली आला असता त्याची नजर पार्किंग परिसरात खेळणाऱ्या एका 5 वर्षांच्या मुलीवर पडली. आजूबाजूला कुणी नाही हे पाहून तो या मुलीला लिफ्टमध्ये घेऊन आला. लिफ्टमध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केले. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर या मुलीला सोडल्यावर पीडित मुलगी घरी गेली. घरी गेल्यावर या मुलीला उलट्या झाल्या. तेव्हा या मुलीच्या आईने तिला विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

सुरक्षा रक्षकाने ताब्यात घेतले : लगेचच मुलीचे आईवडील खाली आले. आरोपी पळून जात असताना त्याची ओळख पटवून त्याला सुरक्षा रक्षकाने ताब्यात घेत पोलिसांच्या हवाले करण्यात आलं. एसी रीपेरिंगचं काम करणारा अख्तर हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून त्याने याआधीही अशी गैरकृत्ये केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या त्याची कसून चौकशी केली जाते आहे. सदर घटनेमुळे इमारत तसेच सोसायट्यांमध्ये येणाऱ्या अनोळखी व्यक्तींबाबत सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्या दृष्टीने सतर्कता बाळगण्याचे आवाहनही तळोजा पोलिसांनी केले.

Last Updated : Dec 9, 2022, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.