ETV Bharat / state

Pune Crime News : कात्रज घाटात प्रवाशाकडून नग्न होऊन रिक्षाचालक महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

author img

By

Published : Dec 30, 2022, 1:53 PM IST

Updated : Dec 30, 2022, 3:45 PM IST

Pune Crime News
कात्रज घाट

रिक्षा प्रवास सुरक्षित प्रवास आहे का नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कात्रज घाटात एका रिक्षा प्रवाशाने नग्न (naked passenger in Katraj Ghat) होऊन रिक्षाचालक महिलेचा (Woman rickshaw driver) पाठलाग केला आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. 26 डिसेंबरच्या रात्री आठ वाजता कात्रज घाटात हा सर्व ( Pune Crime News ) प्रकार घडला.

पुणे : प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका व्यक्तीने रिक्षा चालक महिलेसोबत (Woman rickshaw driver) किळसवाणे कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज घाटात या व्यक्तीने रिक्षा घेऊन जाण्यास भाग पाडले आणि रिक्षा चालक महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. रिक्षा चालक महिलेने याला नकार दिल्यानंतर अंगावरील सर्व कपडे (naked passenger in Katraj Ghat) काढून या महिलेचा पाठलाग केला. 26 डिसेंबरच्या रात्री आठ वाजता कात्रज घाटात हा सर्व प्रकार घडला.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा (case registered and accused arrested) दाखल करण्यात आला आहे.



याप्रकरणी अधिक माहिती : रिक्षा प्रवास सुरक्षित प्रवास आहे का नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना पुण्यात घडली आहे. फिर्यादी या रिक्षा चालवून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. 26 डिसेंबरच्या रात्री त्या रिक्षा चालवत असताना आरोपी त्यांच्या रिक्षात प्रवासी म्हणून बसला. कात्रज घाटात जायचे असल्याचे सांगून त्याने तिकडे रिक्षा नेण्यास भाग पाडले. दरम्यान रात्री दहा वाजताच्या सुमारास कात्रज घाटातील अंधारातून रिक्षात जात असताना एका लॉजिंगच्या बोर्डजवळ त्याने रिक्षा थांबण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपी फिर्यादी महिलेला जेवणासाठी बळजबरी करू लागला. फिर्यादी महिलेने त्याला नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्या गालात चापट मारली (accused slapped her on cheek) आणि शारीरिक संबंधाची मागणी करू (started demanding physical intercourse) लागला.



कात्रज घाटात फिर्यादींचा पाठलाग केला : 'मला तुझ्या सोबत इथेच शारीरिक संबंध करायचे आहेत. या अंधारात तुझ्या मदतीला कोणीही येणार नाही. तुला काय करायचे ते कर' असे बोलून आरोपीने अंगावरील सर्व कपडे काढले आणि फिर्यादीच्या शेजारी बसला. या सर्व प्रकारामुळे फिर्यादी (Pursued plaintiffs in Katraj Ghat) घाबरल्या आणि त्या रिक्षातून खाली उतरून पळू लागल्या. त्यानंतर आरोपीनेही नग्न अवस्थेत कात्रज घाटात फिर्यादींचा पाठलाग ( Pune Crime News ) केला.

गुन्हा दाखल करून आरोपीला अटक : या सर्व प्रकाराने घाबरलेल्या फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. निखिल अशोक मेमजादे (Nikhil Ashok Memzade) (वय 30, रा. शंकर मठ हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. एका 38 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा (case registered and accused arrested) दाखल करण्यात आला आहे.

Last Updated :Dec 30, 2022, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.