ETV Bharat / state

Husband Kidnapping Case: बायकोनेच दिली डॉक्टर नवऱ्याच्या अपहरणाची सुपारी...मग पुढे काय झाले...वाचा

author img

By

Published : Aug 11, 2023, 8:03 PM IST

घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात सुरू असताना एका पत्नीने तिच्या डॉक्टर पतीच्या अपहरणाची सुपारी दिली. अपहरणकर्त्यांनी त्या डॉक्टरला बहाण्याने घटनास्थळी बोलावले. मात्र त्याला धमकावून त्याच्याकडून 27 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला. याप्रकरणी तक्रारदार डॉक्टर पतीने पुण्यातील काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Husband Kidnapping Case
अपहरण

पुणे : पुणे शहरात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. सध्या शहरात असे गुन्हे घडत आहे ज्याची कोणीच कल्पना करू शकत नाही. अशीच चक्रावणारी घटना पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. विभक्त राहणाऱ्या पतीची पत्नीनेच सुपारी दिली. मात्र ज्यांना सुपारी दिली त्यांनी या महिलेच्या पतीचे अपहरण केले आणि ठार मारण्याची भीती दाखवून त्याच्या घरातून 27 लाख 10 हजार रुपयांची चोरी केली आहे.


आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल : हा प्रकार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडकी परिसरात घडला आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीसठाण्यात प्रदीप मारुती जाधव (वय 48 वर्षे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार 10 अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'या' बहाण्याने डॉक्टरला बोलावले : याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे जनावरांचे डॉक्टर असून काही महिन्यांपासून त्यांचे त्यांच्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात प्रकरण सुरू आहे. फिर्यादी हे जेव्हा 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात होते तेव्हा सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांना फोन आला की, वडकी गायकवाड रोड येथे काही कुत्रे आजारी झाली आहेत. आपण तात्काळ यावे. फिर्यादी हे त्या ठिकाणी गेले असता तिथे 3 ते 4 जण हे उभे होते आणि त्यांनी नंबर प्लेट नसलेल्या चारचाकी गाडीत जबरदस्तीने या डॉक्टरांना बसवले आणि अपहरण केले.


जिवंत ठेवण्यासाठी मागितले 27 लाख : फिर्यादी डॉक्टरांचे अपहरण केल्यावर त्या लोकांनी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून तुझ्या नावाची तुझी पत्नी आणि मेहुण्याने सुपारी दिली आहे. तुला आम्ही मारून टाकणार आहो. तू आम्हाला 20 लाख रुपये दिले तर आम्ही तुला सोडू. नाही तर आम्ही मारू असे त्यांनी फिर्यादीला सांगितले. यानंतर आरोपींनी फिर्यादीला त्याच्या राहत्या घरी घेऊन जाऊन जबरदस्तीने घरातील दागिने आणि रोख रक्कम अशी 27 लाख 10 हजार रुपये घेऊन गेले. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.

हेही वाचा:

  1. Mumbai Crime News: शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाचे गुंडा'राज', व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
  2. Fake Kidnapping : आठवीच्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही म्हणून रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट! वाचा कसे फुटले बिंग
  3. Youth Kidnapping Beed : माजलगावात युवकास मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.