ETV Bharat / state

Vishal Gaikwad Murder Case : भर चौकात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत सराईत गुन्हेगाराचा खून

author img

By

Published : Dec 3, 2022, 6:16 PM IST

Vishal Gaikwad Murder Case
भर चौकात गोळ्या झाडून हत्या

पिंपरी-चिंचवड शहरात पूर्ववैमनस्यातून एका कुख्यात गुन्हेगाराची हत्या झाल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले. विशाल गायकवाड असे मृतकाचे नाव आहे. विशालवर अज्ञातांनी गोळ्या झाडून (Murder by shooting criminal) आणि कोयत्याने वार करून हत्या (stabbing to death) केली. याप्रकरणी 6 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. (six arrested in Murder case) विशाल (Vishal Gaikwad Murder Case) हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा यासह इतर 12 गुन्हे दाखल आहेत.

पिंपरी-चिंचवड (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरात सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून (Murder by shooting criminal) आणि कोयत्याने वार करून हत्या (stabbing to death) करण्यात आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात (six arrested in Murder case) घेण्यात आले आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले आहे. विशाल गायकवाड (Vishal Gaikwad Murder Case) असे हत्या झालेल्या सराईत गुन्हेगारचे नाव आहे. त्याचे वॉशिंग सेंटर होते. त्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. Latest news from Pune, Pune Crime

विशालचा निर्घृण खून : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेला विशाल हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा यासह इतर 12 गुन्हे दाखल आहेत. रात्री उशिरा मोहन नगर येथील परशुराम चौकात बसला होता. तेव्हा, 13 जणांच्या टोळक्याने अचानक येऊन पिस्तूलातून गोळ्या झाडत आणि कोयत्याने वार करून विशालचा निर्घृण खून केला आहे. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला अस पोलिसांनी सांगितले आहे. सराईत गुन्हेगार दादा कांबळे, विशाल लष्करे ह्यांनी हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यांचा शोध पोलिस घेत असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आला आहे. यात, एका अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग आहे.

33 दिवसांमध्ये 7 जणांचा खून : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 33 दिवसांमध्ये सात जनांची हत्या झालेली आहे. हे वास्तव आहे जे कोणी नाकारू शकत नाही. गुन्हेगारी आटोक्यात आणण पोलिस आयुक्त अंकुश शिंदे समोर मोठं आव्हान आहे. पण, यावर ते ठोस अशी उपाययोजना करताना दिसत नाहीत. गुन्हे शाखा केवळ नावाच्या राहिल्या असून भुरटे चोर, गुन्हेगार पकडण्यात च ते धन्यता मानत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.