ETV Bharat / state

Two children drown in farm : शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू; धायरीतील घटना

author img

By

Published : Jul 3, 2022, 8:31 PM IST

पुण्याच्या धायरी येथील खंडोबा मंदिराजवळ असणाऱ्या शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू ( Two children drown in farm) झाला आहे. सुरज शरद सातपुते (वय 14), पुष्कर गणेश दातखिंडे (वय 13 ) अशी त्यांची नावे आहेत. गळाच्या साहाय्याने अग्निशमक दलाकडून ( Fire brigade ) दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Farm pond
शेत तळे

पुणे- पुण्याच्या धायरी येथील खंडोबा मंदिराजवळ असणाऱ्या शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू ( Two children drown in farm ) झाला आहे. रायकर मळ्यातील सकाळी ९. ३० वाजता ही घटना घडली. सुरज शरद सातपुते (वय 14), पुष्कर गणेश दातखिंडे (वय 13 ) अशी त्यांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. दोन्ही मुले पाण्यात बुडाल्याची माहित अग्निशमक दलाच्या नियंत्रण कक्षास ( Fire brigade control room) मिळाल्यानंतरतातडीने सिहंगड अग्निशमन केंद्र व पीएमआरडीए अग्निशमन केंद्र येथून दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली. गळाच्या साहाय्याने दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर, ते मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.