ETV Bharat / state

Transgender Protest: आमदार नितेश राणे विरोधात तृतीय पंथीयांचे रास्ता रोको आंदोलन, मध्यरात्रीपासून मांडला ठिय्या

author img

By

Published : Jul 12, 2023, 11:30 AM IST

Updated : Jul 12, 2023, 12:59 PM IST

आमदार नितेश राणे यांनी तृतीय पंथीयांबाबत केलेल्या अवमानजनक व्यक्तव्याबद्दल मंगळवारी मध्यरात्रीपासून तृतीय पंथीय बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन करत आहेत. तसेच त्यांनी राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केलेल्या ट्विटमध्ये तृतीयपंथीयांचे प्रमुख असे म्हटले होते.

Transgender Protest
नितेश राणे विरोधात तृतीय पंथीयांचे आंदोलन

तृतीय पंथीयांचे आंदोलन

पुणे : आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना हे बघा तृतीयपंथीयांचे सरदार, असे वक्तव्य केले होते. या विरोधात तृतीय पंथीय आक्रमक झाले आहेत. राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. आमदार नितेश राणे विरोधात मध्यरात्रीपासून पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीयपंथीय समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडून नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाही आहे. पण जोपर्यंत नितेश राणे यांच्यावर पुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीने आम्ही आंदोलन करू, अशी आक्रमक भूमिका यावेळी तृतीयपंथीयांनी घेतली आहे. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

नितेश राणे विरोधात तृतीय पंथीयांचे आंदोलन

ट्रॅफिक जाम करण्याचा प्रयत्न : तृतीयपंथी आक्रमक होत रास्ता रोको करत असताना पोलिसांकडून या तृतीय पंथीना धरपकड करण्यात आली. यावेळी मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाले. यावेळी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील म्हणाले की, आम्ही त्यांना आंदोलन करू देत होतो. पण जेव्हा त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही त्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून ट्रॅफिक जाम करण्याचा प्रयत्न केला जात होता. तेव्हा आम्ही त्यांना पकडले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

पोलीस प्रशासन जबाबदार : यावेळी तृतीयपंथी शामिभा पाटील म्हणाले की, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असताना आमची मागणी होती की आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. ही मागणी आम्ही करत होतो. मात्र सरकारच्या दबावाला बळी पळत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येत नाही. उलट आमच्यावरच बळाचा वापर करून आम्हाला पकडण्यात आले आहे. उद्या आमचे काही बरे वाईट झाले, तर याला पोलीस प्रशासन जबाबदार असणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. Jode Maro Protest: खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन
  2. Haddi Movie : नवाजुद्दीनच्या 'हड्डी' चित्रपटात 300 ट्रान्सजेंडर दिसणार
  3. कल्याण रेल्वेस्थानकात तृतीयपंथीयांच्या वाटमाऱ्या; तरुणाला लुटणाऱ्या एकाला बेड्या
Last Updated :Jul 12, 2023, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.