ETV Bharat / state

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

author img

By

Published : Nov 30, 2020, 4:11 PM IST

training-of-staff-for-graduate-and-teacher-constituency-elections-in-pune
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीदरम्यान केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाच्या दिवशी पार पाडावयाची जबाबदारी विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे.

बारामती (पुणे) - पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२० साठी नियुक्त केलेल्या केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाच्या दिवशी पार पाडावयाची जबाबदारी विषयक प्रशिक्षण व मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप आज नवीन प्रशासकीय भवन येथील बैठक सभागृहामध्ये उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडले.

सामाजिक अंतर ठेवून मतदान प्रक्रिया पार पाडावी -

प्रांताधिकारी कांबळे यांनी बारामती तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघ-२०२० च्या निवडणुकीबाबत प्राथमिक माहिती दिली. मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना दिलेली जबाबदारी अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, ही निवडणूक कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात होत असल्याने प्रत्येक मतदान केंद्राला मास्क, सॅनिटायझर, थर्मलस्कॅनर या वस्तूंचा पुरवठा करण्यात येईल. त्यांचा वापर करावा. प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात आली असून सामाजिक अंतर ठेवून मतदान प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

या सूचना देण्यात आल्या-

यावेळी मतदान कक्षाची रचना कशी असेल, मतदान कक्षाचा प्रोटोकॉल कसा पाळावा, मतपेटीचा वापर कसा करावा, विविध प्रकारचे नमुने व अर्ज कसे भरावेत, मतपत्रिका, विविध शिक्के, शाई, स्केच पेन यांचा योग्य ठिकाणी कसा वापर करावा, मतदारांनी कशा प्रकारे मतदान करणे आवश्यक आहे, मतदाराची कोणती ओळखपत्रे तपासण्यात यावीत, संविधानिक, असंविधानिक व इतर लिफाफे यांचा उपयोग कसा करण्यात यावा, मतपेटी कशी सिलबंद करण्यात यावी, मतपत्रिकेची घडी कशी करावी, याबाबत सूचना देण्यात आल्या.

ही असेल मतदान केंद्रप्रमुखाची जबाबदारी -

मतदानाचे कोणतेही साहित्य पोलीस संरक्षणाशिवाय इतरत्र हलवता येणार नाही, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी. तसेच मतदानाच्या दिवशी सूक्ष्म निरीक्षक केंद्राला भेट देऊ शकतात. त्यांना प्रोटोकॉलनुसार आवश्यक ती माहिती पुरविण्यात यावी व त्यांच्या सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही मतदान केंद्रप्रमुखाची आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली मतदान प्रक्रिया पार पडेल. केंद्र प्रमुखांनी भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करुन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तत्पर रहावे, असेही निर्देश कांबळे यांनी दिले. यानंतर मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा- मराठा क्रांती मोर्चाची 8 डिसेंबरला विधानभवनावर धडक; राज्यस्तरीय बैठकीत निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.