ETV Bharat / state

Daund Patas Accident : दौंड - पाटस मार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

author img

By

Published : Nov 14, 2022, 12:20 PM IST

Daund Patas Accident
दौंड पाटस अपघात

दौंड पाटस मार्गावर भीषण अपघात झाला. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात ( Tractor and two wheeler accident ) झाला . या अपघातात दुचाकीवरील तीन युवकांचा मृत्यू झाला ( Three died in Daund Patas road accident ) आहे .

दौंड : दौंड पाटस मार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात ( Tractor and two wheeler accident ) झाला . या अपघातात दुचाकीवरील तीन युवकांचा मृत्यू झाला ( Three died in Daund Patas road accident ) आहे . मृत युवक हे काष्टी गावातील होते . या अपघातात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावावर शोककळा पसरली आहे . ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली ला रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत (Sugarcane transport Tractor Two Wheeler Accident ) आहे .


भीषण अपघात तिघांचा मृत्यू : या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऊस वाहतुक करणारा ट्रॅक्टर दौंड शुगर कारखाना येथे पाटस दौंड रोड ने ऊस घेऊन जात होता. या ट्रक्टर च्या ट्रॉली ला दुचाकी ने मागून धडक दिली. रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला. दुचाकी नंबर MH16 BP 9280 पाठीमागून धडक दिल्याने गणेश बापू शिंदे वय 25,ऋषिकेश महादेव मोरे वय 23,स्वप्नील सतीश मनुचार्य वय 24 या तिघांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत .


ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याची गरज : सध्या ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे .तालुक्यातील कारखाने सुरू झाले आहेत .ऊस वाहतुक करणारी वाहने ऊस वाहतूक करत आहेत .ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने अनेकदा अपघात होत आहेत . यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवणे आवश्यक आहे . याबाबत प्रशासन जनजागृती करत आहे . मात्र याकडे ट्रॅक्टर चालक दुर्लक्ष करत आहेत . यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.