ETV Bharat / state

भाजपाच्या खरेदी-विक्री कौशल्याला राजमान्यता देणारा आजचा निकाल - सुषमा अंधारे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 10:59 PM IST

Sushma Andhare : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतचा निर्णय आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. (MLA Disqualification) खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असून 16 आमदारही पात्र असल्याचा निकाल अध्यक्षांनी दिला आहे. (Vidhan Sabha Speaker) भाजपाच्या खरेदी-विक्री कौशल्याला राजमान्यता देणारा आजचा निकाल असल्याचं यावेळी उबाठा गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. (Rahul Narvekar)

Sushma Andhare at Pune
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे

राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे

पुणे Sushma Andhare : नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर विविध राजकीय पक्ष तसंच नेते मंडळींची प्रतिक्रिया येऊ लागली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, या निकालाबाबत माझी शून्य प्रतिक्रिया आहे. (BJP Skills) न्याय होणार की अन्याय होणार हे खूपच आधी माहीत होतं आणि हा निकाल बेंचमार्क असून आमच्या नंतर आता राष्ट्रवादीला देखील अशाच पद्धतीनं सामोरे जावं लागणार आहे. आजचा निर्णय हा भाजपाच्या अखत्यारित राहून विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी काम केलं आहे. यापुढेही देशातील राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेऊन आपली पावले ठेवावी. निकालाचा एकंदरीत विचार केला असता ज्यांनी पक्षाला जन्माला घातलं, वाढवलं ते बाळासाहेबांचे विचार आणि घटना बाजूला सारण्याचं काम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. भाजपाच्या खरेदी-विक्री कौशल्याला राजमान्यता देणारा आजचा निकाल असल्याचं यावेळी अंधारे यांनी मत नोंदवलं. (Uddhav Thackeray)


भाजपाच्या खाल्लेल्या मिठाला इमान राखण्याचं काम : विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, विधानसभा अध्यक्षांनी काढलेल्या निष्कर्षाचा हेवा वाटावा असा आहे. कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना कोणाला बडतर्फ करण्याचा अधिकारच नाही हा निर्णय देणं हास्यास्पद आहे. अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावरून असं दिसून येतं की, शिवसेनेचा जन्म हा २०२२ साली झाला की काय? असा सवाल निर्माण होणं साहाजिक आहे. शिवसेनेच्या सर्व नियमांना पायदळी तुडवल्यानं नार्वेकरांना बेंच मार्क मिळाला आहे. जसे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे तसं लोकांच्या विचारात बदल होईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली तरी आश्चर्य वाटू नये. नार्वेकरांनी भाजपाच्या खाल्लेल्या मिठाला इमान राखण्याचं काम प्रामाणिकपणे पार पाडलेलं आहे, अशी टीका यावेळी अंधारे यांनी केली.

पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन : या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं पुण्यातील बालगंधर्व चौकात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

हेही वाचा:

  1. अखेर आमदार अपात्रतेचा महानिकाल लागला! शिंदेंसह ठाकरे गटाचे सर्व आमदार पात्र; खरी शिवसेनाही एकनाथ शिंदेंकडेच
  2. उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर पवारांची प्रतिक्रिया
  3. नार्वेकरांच्या निकालावर काही म्हणाले लोकशाहीचा विजय, तर काही म्हणाले लोकशाहीचा गळा घोटला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.