ETV Bharat / state

कात्रज ते येरवडा प्रवासासाठी रिक्षाचालकाने आकारले 4300 रुपये!

author img

By

Published : Sep 20, 2019, 5:06 PM IST

रिक्षाचालकांचे अनेक प्रताप यापूर्वी आपण ऐकले असतील. रिक्षाचालक प्रवास भाड्यावरून कायम वाद घालताना दिसतात. पुणे येथे काही दिवसांपूर्वी कात्रज ते येरवडा या प्रवासासाठी एका रिक्षाचालकाने 4300 रुपये इतके भाडे घेतले.

अशकंद पानिग्रही, प्रवासी

पुणे - रिक्षाचालकांचे अनेक प्रताप यापूर्वी आपण ऐकले असतील. काही रिक्षाचालक जवळच्या अंतराचे भाडे घेतच नाहीत, तर काही प्रमाणापेक्षा जास्त भाडे आकारतात. काही दिवसांपूर्वी कात्रज ते येरवडा या प्रवासासाठी एका रिक्षाचालकाने 4300 रुपये इतके भाडे घेतले.

कात्रज ते येरवडा या प्रवासासाठी एका रिक्षाचालकाने 4300 रुपये इतके भाडे घेतले


अशकंद पानिग्रही हा तरुण बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बंगळुरुहुन पुण्यातील कात्रज परिसरात उतरला. अशकंद याला येरवड्यातील शास्त्रीनगरमध्ये जायचे होते. त्याने कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला. पहाटेची वेळ असल्यामुळे कॅब मिळाली नाही. म्हणून त्याने जवळच थांबलेली रिक्षा पकडली. मीटरनुसार भाडे घेण्याचे ठरले.

हेही वाचा - तृप्ती देसाईंच्या वडीलांना सहा महिन्यांच्या शिक्षेसह 60 लाखांचा दंड; 'चेक बाऊन्स' प्रकरण भोवले


मात्र, येरवड्यात उतरल्यानंतर रिक्षाचालकाने अशकंदकडे 4300 रुपयांची मागणी केली. इतके पैसे कशाचे असे विचारल्यानंतर रिक्षाचालकाने 1200 रुपये टोल द्यावा लागणार असल्याचे सांगितले. आजूबाजूला असणारा एकांत बघून अशकंद याने फारसा विरोध न करता पैसे दिले. मात्र, रिक्षाचा क्रमांक नोंद करून त्याने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे.

Intro:पुण्यातील रिक्षाचालकांचे अनेक प्रताप यापूर्वी आपण ऐकले असतील, पाहिले असतील..हे रिक्षाचालक जवळचे भाडे घेतच नाहीत अशा तक्रारी आहेत..घेतले तरी अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात..दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतील रिक्षाचालकाने तर कहरच केला..कात्रज ते येरवडा या प्रवासासाठी त्याने चक्क 4300 रुपये इतके भाडे घेतले..Body:अशकंद पानिग्रही हा तरुण बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बंगळूरहुन पुण्यातील कात्रज परिसरात उतरला..त्याला येरवड्यातील शास्त्रीनगरमध्ये जायचे होते. त्याने कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला पण पहाटेची वेळ असल्यामुळे लॅब मिळाली नाही..अखेर त्याने जवळून जाणारी रिक्षा पकडली..सुरवातीला मीटरनुसार भाडे घेण्याचे ठरले होते..या रिक्षात आणखी एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत बसली होती..तो रिक्षाचालकाचा मित्र होता..
पण येरवड्यात उतरल्यानंतर रिक्षाचालकाने 4300 रुपयांची मागणी केली..इतके पैसे कशाचे असे विचारल्यानंतर रिक्षाचालकाने 1200 रुपये टोल द्यावा लागणार असल्याचे सांगितले..पण चालक, मद्यधुंद व्यक्ती आणि आजूबाजूला असणारा एकांत बघून प्रवाशाने फारसा विरोध न करता पैसे दिले आणि काढता पाय घेतला..
Conclusion:मात्र रिक्षाचा क्रमांक नोंद करून त्याने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र पहिल्यांदाच पुण्यात आल्यावर अश्या प्रकारचा वाईट अनुभव आल्याचं त्यानी सांगितले. पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.