ETV Bharat / state

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तैनात

author img

By

Published : Jun 17, 2020, 8:58 PM IST

team of medical officers deployed
पुण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तैनात

कोरोनाच्या अनुषंगाने रुग्णांवर उपचार करीत असलेल्या रुग्णालयांचे लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे. काही खासगी रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच काही खासगी रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर वाढीव दर आकारणी करत असल्याच्याही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

पुणे - शहरात कोरोना उपचाराबाबत खासगी रुग्णालयाकडून केल्या जाणाऱ्या मनमानीला आता प्रशासनाकडून चाप लावला जाणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणू प्रार्दुभाव निर्मूलन आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या अनुषंगाने रुग्णांवर उपचार करीत असलेल्या रुग्णालयांचे लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे. काही खासगी रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच काही खासगी रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर वाढीव दर आकारणी करत असल्याच्याही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबी गंभीर असून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या आहेत. त्यामुळे, रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय देयकांची तपासणी करण्यासाठी पाच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. सोबतच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

या बैठकीत कोरोनाच्या अनुषंगाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. सोबतच 21 मे रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा आरक्षित करणे. त्याचबरोबर रुग्णालयातील उपलब्ध असलेले बेडस्, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड, खासगी रुग्णालयात आरक्षित असलेले विलगीकरण कक्ष तसेच रुग्णालयात रुग्णांवर उपचार केल्यानंतर देण्यात येणाऱ्या खर्चाबाबतचा आढावाही घेण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.