ETV Bharat / state

Supriya Sule सरकारमधील वाचाळवीर आमदारांबाबत पंतप्रधान, गृहमंत्र्याकडे सुप्रिया सुळे तक्रार करणार

author img

By

Published : Aug 22, 2022, 9:40 AM IST

Updated : Aug 22, 2022, 10:52 AM IST

सुप्रिया सुळे राज्य सरकारमधील काही वाचाळवीर आमदारांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहेत. ही देशाच्या दृष्टीने ही बाबत गंभीर असल्याचेही सुळे यांनी म्हटलं sule complain maharashtra government mlas to pm narendra modi आहे.

Supriya Sule
Supriya Sule

बारामती - बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात त्यांचे नाव घेऊन समाजकारण आणि राजकारण करण्याचा प्रथम अधिकार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. शिवसेनेचा भावी वारसदार कोण असेल याबाबत बाळासाहेब ठाकरे यांनीच एका जाहीर कार्यक्रमात 'माझ्यावर जसे तुम्ही प्रेम केले, तसेच उद्धववरही करा', असे म्हणाले होते. याची आठवण करून देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरे असल्याचे सांगितले. सुप्रिया सुळेंनी भिगवण येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

खासदार सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'देशाच्या दृष्टीने ही गंभीर बाब' - शिंदे सरकार स्थापणहोण्यापूर्वी भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी, शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर वेगवेगळे आरोप करत होते. मात्र, सध्या तेच लोक सरकारमध्ये आहेत. यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, तिकडे गेलेल्या अनेकांना सरकारने क्लीनचीट दिली आहे. तिकडे गेलेले अनेक नेते असे म्हणतात की आम्ही भाजपमध्ये आल्यापासून आम्हाला काही अडचणी नाहीत. राज्यातील सरकारमधील एका गृहस्थाने तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे नाव घेत थेट पत्रकारांसमोरच म्हटलं मी एका भाजपच्या महत्त्वाच्या नेत्याला भेटलो आहे. त्या नेत्याने मला शब्द दिला आहे की, मला काही अडचण येणार नाही. त्यामुळे मला सकाळी सात वाजता कोणी उठवायला येईल याची मला चिंता नाही. देशाच्या दृष्टीने ही गंभीर बाब असल्याने याबाबत सदर गृहस्थाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या निदर्शनास वरील बाब आणून देणार असल्याचे सुळेंनी sule complain maharashtra government mlas to pm narendra modi सांगितले.

केंद्रात सत्ता आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणायचे ना खाऊंगा ना खाने दूंगा.पण त्यांच्याच सरकारमधील एका मंत्र्याचे नाव घेऊन एखादा आमदार बोलत असेल तर हे देशाच्या हिताचे नाही. तसेच, यामुळे पंतप्रधानांचे नावही खराब होत आहे, असेही सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याच्या दृष्टीने भाजपाने जय्यत तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्यावरती बोलताना सुप्रिया सुळेंनी म्हटलं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीत येत असतील तर मी त्यांचे स्वागतच करेन. देशाच्या अर्थमंत्री येत असतील तर बारामतीकरांना त्याचा आनंदच वाटेल. निवडणूक लढण्यासाठी दोन्ही बाजूला कोणी ना कोणीतरी पाहिजेच असते. ज्याचा अभ्यास चांगला आहे तो पास होईल, असे भाष्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

हेही वाचा - Hearing on Sanjay Raut Custody शिवसेना खासदार संजय राऊत यांना जेल की बेल, आज येणार निर्णय

Last Updated : Aug 22, 2022, 10:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.