ETV Bharat / state

इंग्रजी पेपर मधील चुकीच्या ‘त्या’ प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार

author img

By

Published : Mar 5, 2022, 5:57 PM IST

बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) कालपासून सुरुवात झाली. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या परिक्षेत 1 गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने ( wrong question in English paper) विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार (Students will get 1 mark )आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (State Board of Secondary and Higher Secondary Education) सांगण्यात आले आहे. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत.

Board of Education
शिक्षण मंडळ

पुणे : ‘बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये एक गुणांचा प्रश्न विचारताना चुक झाल्याचे ( wrong question in English paper) दिसून आले. प्रश्न विचारताना छपाईमध्ये ही चुक झाली. मुख्य परीक्षा नियंत्रक आणि बोर्डाचे अभ्यास मंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत या प्रश्नाचा एक गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावा, याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इंग्रजीच्या पेपरमध्ये ‘तो’ संबंधित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नासाठी असलेला एक गुण देण्यात येणार (Students will get 1 mark ) आहे.’’ असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारल्या बाबतच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे केल्या होत्या. बोर्ड अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोर्डाकडून एक गुण दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.