ETV Bharat / state

Special Report : पोस्टमन काका येणार ई बाईकवर, वाचा स्पेशल रिपोर्ट

author img

By

Published : Nov 3, 2022, 8:48 AM IST

Updated : Nov 3, 2022, 9:00 AM IST

पोस्टमन आता 'ई- बाइक' वरून टपाल वाटप करताना दिसणार (Pune Post Department start use of e bikes) आहेत. पोस्टाच्या पुणे विभागाकडून राज्यात पहिल्यांदाच 'ई-बाइक'च्या वापराचा प्रयोग सुरू केला गेला (Pune Post Department) आहे.

Pune Post Department start use of e bikes
पुणे पोस्ट विभागाने ई बाईकचा वापर सुरू केला आहे

पुणे : ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता खाकी कपडे आणि सायकलची घंटी वाजवत, सुख:दुखाची खबरबात न चुकता पोहचविणारे पोस्टमन आता 'ई- बाइक' वरून टपाल वाटप करताना दिसणार (Pune Post Department start use of e bikes) आहेत. पोस्टाच्या पुणे विभागाकडून राज्यात पहिल्यांदाच 'ई-बाइक'च्या वापराचा प्रयोग सुरू केला गेला (Pune Post Department) आहे.



प्रायोगिक तत्वावर सहा 'ई-बाइक' : आजपर्यंत आपण पोस्टमन काका हे सायकलवर प्रवास करताना पहिला आहे. पण आत्ता पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने हा ई बाईक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणे विभागाकडून या उपक्रमासाठी प्रायोगिक तत्वावर सहा 'ई-बाइक' वापरण्यात येत आहेत. पोस्टाच्या पिंपरी-चिंचवड (पूर्व) पार्सल सेवेसाठी या दुचाकी वापरण्यात येत आहे. या ई बाईकमुळे कामाची गती तसेच पोस्टमन काका यांच्यात ऊर्जा देखील वाढली आहे. मागच्या वर्षभरात चाळीस हजारांमध्ये पार्सल हे पोस्टमन काकाच्याद्वारे पाठवण्यात आले होते. मात्र, आता या ई बाईकमुळे यात वाढ होऊन ते 48 हजार पर्यंत पोहचले आहे, अशी माहिती यावेळी पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली आहे.

पुणे पोस्ट विभागाने ई बाईकचा वापर सुरू केला आहे



पोस्टाच्या माध्यमातूनच चार्जिंगसाठी स्टेशन : ही सेवा पोस्टात पार्सल सेवेसाठी सध्या वापरली जात आहे. पार्सलसाठी पोस्टमन हे एक तर सायकल किंवा त्यांची स्वतःची मोटरसायकलवर जात होते. यादरम्यान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पार्सल देत असताना अनेक समस्या येत होत्या. पण आत्ता या ई बाईकमुळे काम सोपे झाले आहे. एका ई बाईकला चार्जिंग केल्यानंतर 60 ते 70 किमीपर्यंत प्रवास केला जातो. यामुळे कोणतेही समस्या सध्यातरी येत नाही. तसेच पोस्टाच्या माध्यमातूनच सोलावरच पोस्टच्या कार्यालयात चार्जिंग स्टेशन उभारण्यात आल्याने स्टेशनमध्ये या ई बाईकला चार्जिंग केले जाते, असल्याची माहिती देखील यावेळी जायभाये यांनी (Special report on Pune Post Department) दिली.

Pune Post Department start use of e bikes
पुणे पोस्ट विभागाने ई बाईकचा वापर सुरू केला आहे


केंद्र शासनाकडून 'ई-वाहनांना' प्रोत्साहन : पुणे विभागात सुमारे ४०० ते ५०० पोस्टमन आहेत. शहरात येणारी पत्रे, पोस्टाच्या माध्यमातून आलेल्या शासकीय नोटीस तसेच नागरिकांच्या पसंतीस उतरलेल्या पार्सल सेवेच्या माध्यमातून नागरिकांना घरापर्यंत पोस्टाकडून सेवा दिली जाते. ही सेवा देणारे पोस्टमन शहरात फिरण्यासाठी सायकल वापरतात, तर काहीपोस्टमन आजही आसपासच्या भागात चालत पत्र पोहचवितात. ठराविक अंतरावर थांबावे लागत असल्याने त्यांच्याकडून पार्सल सेवेसाठी पोस्टमन काका कडून सायकलला प्राधान्य दिले जाते. मात्र, आता केंद्र शासनाकडून 'ई-वाहनांना' प्रोत्साहन दिले जात आहे. या मोहिमेला हातभार लावण्यासह वेगवेगळ्या सुविधा देत पोस्ट खात्यात आता लक्षणीय बदल होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोस्टमनसाठी ई-बाइक' वापरण्यात येणार आहेत. त्याचा वापर राज्यात पुणे विभागातून सुरू करण्यात आला आहे. लवकरच याचा विचार करून राज्यभर तसेच प्रत्येक पोस्टमन काका यांना ई बाईक देण्याचा विचार असल्याचं देखील यावेळी जायभाये यांनी (Post Department start use of e bikes) सांगितले.


पार्सल सेवेपासून सुरुवात : 'ई-बाईक' वरून सेवेची सुरुवात पोस्टाच्या पिंपरी-चिंचवड (पूर्व) विभागासाठी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सहा 'ई-बाइक' पोस्टमनला देण्यात आल्या असून त्यामाध्यमातून आत्ता पार्सल घरोघरी दिली जात आहेत. एप्रिल महिन्यापासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून महिन्याला सरासरी आठ ते दहा हजार पार्सल या वाहनांच्या माध्यमातून पोहचविली जात आहेत. तर, लवकरच इतर पार्सल विभागांसाठी आणि त्यानंतर पोस्टमनसाठीही 'ई-बाइक' उपलब्ध करून देण्यात येणार (use of e bikes) आहेत.

नागरिकांचा कल : यासोबतच पोस्टाच्या अनेक योजनांकडे सध्या नागरिकांचा कल वाढला असून पोस्टाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांसाठी तसेच विशेष करून सुकन्या योजनेला देखील मोठ्या प्रमाणत नागरिकांकडून प्रतिसाद दिला जात आहे. ग्रामीण भागात या सुकन्या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक गावे हे आत्ता सुकन्या यक्त झाले आहेत. अशी माहिती यावेळी पोस्ट कार्यालय पुणे विभागाचे संचालक सिमरन कौर यांनी दिली

Last Updated :Nov 3, 2022, 9:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.