पुणे Sharad Pawar vs Ajit Pawar : 1978 साली घेतलेला निर्णय हा सर्वांना विचारात घेऊन केला होता. त्यावेळी यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निर्णय घेतला. परंतु आता ज्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ते त्या निर्णयाशी तुलना करत आहेत. परंतु तुम्ही ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलात. त्या पक्षाची ध्येयधोरणे पाहून मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं आहे हे विसरलात, पण तुमच्या निर्णयालासुद्धा आमची हरकत नाही. अशी प्रतिक्रिया, शरद पवार (Sharad Pawar Reaction) यांनी अजित पवारांच्या विधानावर दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी कळवलं : शरद पवार आज पुण्यात भरलेल्या भीमथडी यात्रेला भेट देण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. साखर उद्योग मोठ्या अडचणीत आहे. इथेनॉलमुळं फायदा होत होता. गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. परंतु केंद्र सरकारचं याबाबतीत धोरण चुकीचं आहे. त्या संदर्भात मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह यांना लेखी कळवलं आहे. त्यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसंच चर्चा देखील करत आहोत, असं शरद पवार म्हणाले.
शेवटी जनता ठरवते : अमोल कोल्हे यांना मी निवडून येऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती. त्यावर सुद्धा बोलताना शेवटी जनता ठरवते की, कुणाला निवडून द्यायचं. त्यामुळं त्याबाबत जास्त भाष्य करायची मला गरज नाही, असं सुद्धा शरद पवार यावेळी म्हणाले.
निर्णय घेण्याचा पक्षाला अधिकार : वंचित बहुजन आघाडी 48 लोकसभा जागा लढवण्याची तयारी करत आहे. परंतु इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक झाली. त्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष खरगे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचं काही बोलणं सुरू आहे. ते पुढे बोलतील आणि आघाडीला कळवतील शेवटी ज्याचा त्याचा निर्णय घेण्याचा पक्षाला अधिकार आहे.
बारामतीच्या विकासासाठी कुठलीही हरकत नाही : बारामतीत गेल्या दहा पंधरा वर्षात मी कुठल्याही राजकीय पदाधिकाऱ्याची, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली नाही. मी लक्ष देत नव्हतो आता त्यांनी लक्ष दिलं आहे. तर त्या परिसराचा विकास करावा. बारामतीच्या विकासासाठी माझी कुठलीही हरकत नाही, अशी प्रतिक्रिया सुद्धा शरद पवार यांनी दिलीय.
लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवली पाहिजे : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 28 जागा लोकसभेच्या एका सर्वेमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. त्याबद्दल बोलताना सर्वेतून हा अंदाज लावू शकतात. पण ते खरे आहेत, असं म्हणू शकत नाही. शेवटी लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवली पाहिजे, लोक ठरवतील असंही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा -