ETV Bharat / state

Sharad Pawar On Varkari Sansthan : देशाला कष्टकऱ्यांची महासत्ता बनवणारी विचारधारा म्हणजे वारकरी संस्थान - शरद पवार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 6:28 PM IST

Sharad Pawar On Varkari Sansthan
शरद पवार

Sharad Pawar On Varkari Sansthan: आज सर्व देशामध्ये एका बाजूला सनातन धर्म आणि दुसऱ्या बाजूला भागवत धर्म यासंबंधीची चर्चा हल्ली (Sharad Pawar Alandi visit) मोठ्या प्रमाणावर होत आहे. आम्ही याकडे बघत असताना सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी विचारधारा आहे, (NCP President Sharad Pawar) समाजाला शक्तिशाली करणारी ही विचारधारा आहे, (Bhagwat Warkari Samelan) देशाला कष्टकऱ्यांची महासत्ता बनवणारी जी विचारधारा ती विचारधारा आम्हा सर्वांच्या दृष्टीने अंतिम विचारधारा आहे. ही विचारधारा वारकरी संस्थान आहे. (Bhagwat Warkari Federation) ती विचारधारा जतन करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

शरद पवार वारकरी संस्थानाविषयी मत मांडताना

पिंपरी चिंचवड (पुणे) Sharad Pawar On Varkari Sansthan: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (शनिवारी) तीर्थक्षेत्र आळंदी आणि जुन्नर दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्याची सुरुवात शरद पवारांनी माऊलींच दर्शन घेऊन केली. यावेळी आळंदीकरांकडून चांदीची गदा देऊन शरद पवार यांचा सन्मान करण्यात आला. शरद पवारांनी आज आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात माऊलींचे दर्शन घेतले. त्यानंतर शरद पवार यांच्या हस्ते भागवत वारकरी महासंघातर्फे आयोजित एकदिवसीय भागवत वारकरी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच वारकरी संप्रदायातील सर्व प्रवचन कीर्तनकार, प्रबोधनकार, लेखक, वादक, गायक, दिंडीकार इत्यादी सर्व वारकऱ्यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप दिनकर भुकेले महाराज यांची देखील उपस्थिती लाभली होती.

Sharad Pawar On Varkari Sansthan
शरद पवारांचा हार घालून सत्कार

ज्येष्ठ वक्ते मांडणार विचार: कार्यक्रमात संत विचार आणि भारतीय संविधान तसेच मनुस्मृती आणि भागवत वारकरी संप्रदाय या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. इथे संप्रदायातील ज्येष्ठ वक्ते आपले विचार मांडणार आहेत. आळंदी जवळील मुक्ताई लॉन्समध्ये भागवत वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. देश अनेक जाती-धर्मांचा भाषेचा असला तरी त्याचा मूळ विचार हिंदूंचा असो की मुस्लिमांचा की अन्य घटकांचा असो. त्यांच्यामध्ये एक प्रकारचे सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका प्रकर्षाने मांडली जाते. त्याचाच पुरस्कार करणं, ते रुजवणं, ते शक्तिशाली करणं आज खऱ्या अर्थाने आवश्यक आहे. ती आवश्यकता भागवत वारकरी संमेलनाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये रुजवू शकतो, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar On Varkari Sansthan
शरद पवारांचा सत्कार करताना वारकरी संस्थान
प्रदूषित इंद्रायणी बद्दल फक्त आश्वासनच: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी माऊलींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. 2019 नंतर आज पुन्हा शरद पवारांनी ज्ञानेश्वर माऊली यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला आहे. यापूर्वी आळंदी नगरीमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर देहू आणि आळंदी येथून वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी प्रदूषित असल्याचे पुन्हा एकदा आळंदी येथील ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी शरद पवार यांच्या लक्षात आणून दिले. शरद पवार यांनी या संदर्भात संबंधित नेत्यांशी चर्चा करून यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले आहे. पवित्र इंद्रायणी नदी ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषित होत असल्याचे चित्र उघड आहे. त्यावर कोट्यावधी रुपये खर्च देखील केले जात आहेत; मात्र इंद्रायणी अजूनही प्रदूषित आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा:

  1. PM Narendra Modi Pune Visit : दोन महिन्यात पंतप्रधान दुसऱ्यांदा पुणे दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीपूर्वी विशेष लक्ष
  2. Asim Sarode On NCP Dispute : या' कारणानं अजित पवार गटातील आमदार अपात्र ठरतील, कायदेतज्ज्ञ असिम सरोदेंनी वर्तवलं भाकित
  3. Waghnakh contorversy: वाघनखांबाबत शंका उपस्थित केल्यानं आदित्य ठाकरेंवर भाजपा नेत्यांची कडाडून टीका, म्हणाले..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.