ETV Bharat / state

Buldhana Bus Accident : जो अपघातात मृत्यू पावतो 'तो' देवेंद्रवासी होतो, समृद्धी महामार्ग दुर्घटनेप्रकरणी शरद पवारांचा हल्लाबोल

author img

By

Published : Jul 1, 2023, 6:14 PM IST

Sharad Pawar
Sharad Pawar

बुलडाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग दुर्घटनेप्रकरणी ( Accident on Samriddhi Highway ) शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. समृद्धी महामार्गावर मृत्यू पावतो तो, देवेंद्रवासी होतो असे तिथले लोक सांगतात असा हल्लाबोल पवारांनी फडणवीसांवर केला आहे.

शरद पवार यांची प्रतिक्रिया

पुणे : समृद्धी महामार्गावर बुलडाणा येथे झालेल्या अपघातात 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यावरुन सरकारवर टीकेची झोड उठली आहे. रस्त्याचे काम योग्य पद्धतीने न झाल्याने हा अपघात झाल्याची टीका ( Sharad Pawar criticizes Devendra Fadnavis ) सरकारवर होत आहे. यासंदर्भात शरद पवारांनी जोरदार टीका केली असून, समृद्धी महामार्गावर मृत्यू पावतो तो, देवेंद्रवासी होतो असे तिथले लोक सांगतात. या रस्त्याचा जास्त आग्रह देवेंद्र फडणवीसांनी धरला होता, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्रवासी होतो : शरद पवार म्हणाले समृद्धी महामार्गावर ( Fatal accident on Samriddhi highway ) अनेक अपघात झाले. सातत्याने अपघात होत आहेत. हे गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळते.

मी ही एकादा त्या रस्त्याने गेलो होतो. त्यावेळी तेथील लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात. जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्रवासी होतो, असे लोक सांगतात. त्याचे कारण रस्त्याचे काम कदाचित शास्त्रीय पद्धतीने झालेले नसावे. ज्यांनी रस्त्याचे नियोजन केले त्यांना नागरिक दोषी ठरवत आहे. आज जे झाले ते वाईट झाले - शरद पवार

मदत देऊन प्रश्न सुटत नाहीत : 5 लाख मदत देऊन प्रश्न सुटत नाहीत, असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती तयार करावी. त्यांनी रस्त्याची कमतरता शोधून काढावी, रस्त्यावर खुणा बघायला मिळत नाहीत, सलग रस्ता आहे. त्यामुळे वाहन चालवताना काही गोष्टी लक्षात येत नाही, असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या महामार्गाचा नीट अभ्यास होणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.

शिंदे फडणवीस सरकारवर टीका : शिंदे फडवणीस सरकारचे एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. महिलांवरील हल्ले, कोयता गँग ही राज्य सरकारची देणगी आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची क्षमता सरकारमध्ये नाही. महाराष्ट्रात गुंतवणूकदार येत आहेत अशा बातम्या येतात. मात्र, महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर जात आहेत. मी मुख्यमंत्री असताना उद्योजकांना भेटण्यासाठी दोन-अडीच तास द्यायचो. आता उद्योजकच भेटत नाहीत, असे म्हणत पवारांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

  • हेही वाचा -
  1. Buldhana Bus Accident : बुलडाणा बस अपघातस्थळाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट; जखमींची केली विचारपूस
  2. Bus Accident in Buldhana : बसच्या फिटनेससोबतच प्रवाशांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष; गमवावा लागला जीव
  3. Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लोखंडी पोलवर आदळली खाजगी बस त्यानंतर समृद्धी महामार्गावर घडला अनर्थ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.