ETV Bharat / state

काँग्रेस अध्यक्ष पद.. सुशीलकुमार शिंदे म्हणतात, 'बाजारात तुरी आणि कशाला मारामारी'

'हिंदुत्ववादी विचार करणारा पण सर्व धर्मांचा विचार करून महाराष्ट्र वाचवणारा, अशा पद्धतीचा थोर नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब हिंदू धर्मवादी होते. पण त्यांच्याकडे सर्व जाती-धर्माचे लोक होते. ते असे थोर नेते होते, ज्यांनी महाराष्ट्र वाचवण्यासाठी प्रयत्न केले,' असेही सुशील कुमार शिंदे म्हणाले.

ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे न्यूज

author img

By

Published : Jan 24, 2021, 4:44 PM IST

पुणे - काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदेच नाव चर्चीले जात आहे. महाराष्ट्रातून संधी मिळण्याची शक्यता आहे, अस प्रश्न एका कार्यक्रमात सुशीलकुमार शिदें यांना विचारले असता, त्यांनी मला कोणतीही माहिती आणि कल्पना नसल्याचे म्हटले आहे. तसेच, 'बाजारात तुरी आणि कशाला मारामारी' असे म्हणत त्यांनी मिश्कील उत्तरही दिले आहे. 'मी जबाबदारी स्वीकारायला तयार आहे, असे म्हटले तर माझ्यावर आरोप होतील,' असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वपदाचा विषय बाजूला केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष पद.. सुशीलकुमार शिंदे म्हणतात, 'बाजारात तुरी आणि कशाला मारामारी'
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन शतक महोत्सव आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमप्रसंगी सुशीलकुमार शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा - 'चोराच्या आळंदीला पोहोचलेल्यांनी आंदोलनाचे नाटक बंद करा'

महाराष्ट्र वाचवणारा थोर नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्ववादी विचार करणारा पण सर्व धर्मांचा विचार करून महाराष्ट्र वाचवणारा, अशा पद्धतीचा थोर नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब हिंदू धर्मवादी होते. पण त्यांच्याकडे सर्व जाती-धर्माचे लोक होते. ते असे थोर नेते होते, ज्यांनी महाराष्ट्र वाचवण्यासाठी प्रयत्न केले,' असेही सुशील कुमार शिंदे म्हणाले.

हेच 25 वर्ष आधी व्हायला हवे होते

शिवसेना आज ज्या किमान समान कार्यक्रमनुसार सत्तेत आली, तेच हिंदुत्व प्रबोधनकारांना अपेक्षित होते आणि तेच खरे हिंदुत्व आहे.राज्यात शिवसेना २० वर्षानंतर सत्तेत आली असून, खरंतर हेच २५ वर्षे आधी व्हायला हवे होते. त्यामुळे आता पुढे जाऊ या..असे आवाहन देखील या कार्यक्रमाच्या माध्यामातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांनी यावेळी केले. पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा आहे आणि त्या पुण्यात आज प्रबोधनकारांची आणि शिवसेना प्रमुखांची जयंती साजरी होत आहे. ही मोठी ऐतिहासिक घटना आहे अस ही यावेळी सुशील कुमार शिंदे म्हणाले.

हेही वाचा - 'मुलगा होत नाही' म्हणून डॉक्टरकडून पत्नीसह तीन महिन्याच्या मुलीला अमानुष मारहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.