ETV Bharat / state

आमदार शिवेंद्रराजेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, चर्चेला उधाण

author img

By

Published : Jan 24, 2021, 2:49 PM IST

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शिवेंद्रराजे यांची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच पवार यांच्या सातारा दौऱ्यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी पवार यांची भेट घेतली होती. आता ते थेट बारामतीला भेटीसाठी आले होते. या दोघांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चेचा तपशील मिळाला नाही.

सातारा आमदार शिवेंद्रराजे भोसले लेटेस्ट न्यूज
सातारा आमदार शिवेंद्रराजे भोसले लेटेस्ट न्यूज

बारामती - साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, ही भेट राजकीय नसल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले सातारचे आमदार शिवेंद्रराजे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत भेट घेतली. येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये बंद खोलीत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेदरम्यान बंद खोलीत दोघांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश नव्हता.

आमदार शिवेंद्रराजेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, चर्चेला उधाण
हेही वाचा - वीज कापू नका अन्यथा आम्ही पुन्हा जोडणी करू - नितीन गवळी


भेटीमागे राजकीय हेतू नाही - शिवेंद्रराजे

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शिवेंद्रराजे यांची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच पवार यांच्या सातारा दौऱ्यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी पवार यांची भेट घेतली होती. आता ते थेट बारामतीला भेटीसाठी आले होते. या दोघांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चेचा तपशील मिळाला नाही. सदर चर्चेनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील विकासकामांसंबंधी चर्चेसाठी पवार यांच्या भेटीला आलो असल्याचे सांगितले. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'तर महाविकास आघाडीची ताकद कायम राहील, मंत्री ठाकुरांचा संजय राऊतांना टोला'

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.