ETV Bharat / state

Chitra Wagh News: चित्रा वाघ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीसह संभाजी ब्रिगेड आक्रमक

author img

By

Published : Jan 30, 2023, 11:14 AM IST

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना चित्रा वाघ यांनी अजब विधान केले आहे. चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केली आहे. यावरून आता विरोधक हे टीका करत आहे. संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक होत आहे. चित्राताई चंद्रकांत पाटील यांची तेवढी पात्रता नाही, असे यावेळी संतोष शिंदे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनीसुद्धा चित्रा वाघ यांचा समाचार घेतला आहे.

Chitra Wagh on Chandrakant Patil
संतोष शिंदे आणि रुपाली ठोंबरे

प्रतिक्रिया देताना संतोष शिंदे आणि रुपाली ठोंबरे

पुणे: रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, सातत्याने महात्मे असतील, सद्गुरु तुकाराम महाराज असतील, यांच्याबद्दल 'उचलली जीभ लावली टाळ्याला' अशी वक्तव्ये भाजपची लोक करताना दिसतात. त्यांच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना ज्योतिबा फुले यांच्याशी केली. मुळात भाजपने महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी जे विचार समाजाला दिले. जे कार्य त्यांनी केले. त्या विचारांचा थोडातरी अंश भाजपच्या नेत्यांमध्ये आहे का? भाजपमध्ये सातत्याने महिलांना असुरक्षित करण्याची जी वृत्ती आहे. त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याची जी वृत्ती आहे. अश्या लोकांची तुलना महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी तुलना करने लाजिरवाणी गोष्ट आहे, असे यावेळी रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

थेट महात्मा ज्योतिबा फुलेंशी तुलना: पुण्यात नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे दरवर्षी स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचे कार्य समाजासमोर यावे, याउद्देशाने सुरु केलेल्या सन्मान स्त्री शक्ती सोहळ्यात यंदा सहा महिलांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी चित्रा वाघ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि नगरसेवक हेमंत रासने यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केली होती.

महाराष्ट्राची माफी मागावी: ज्या व्यक्तीने महात्मा फुलेंना भीक मागायला लावली. तो माणूस चित्रताई वाघ यांच्या नजरेतून ज्योतिबा कसे काय झाला ? एखादे पद मिळण्यासाठी किती लाचारी करावी. हे चित्राताई वाघ यांच्याकडून शिकावे. महात्मा फुलेंचे साधे नावसुद्धा चंद्रकांत दादांची पात्रता नाही. अगोदर चंद्रकांत दादांनी महाराष्ट्राची माफी मागावी, मग चित्राताई यांनी खोटी खोटी स्तुती करावी. चित्राताई सर्वोत्तम तमाम पुणेकरांची आणि महाराष्ट्राची माफी मागा. तसेच भाजप बहुजन महापुरुष द्रोही आहे, अशी टीका यावेळी शिंदे यांनी केली आहे.


काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ:चंद्रकांत दादा खूप चांगले बोलले की, आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरुषांनी ओवाळले आहे. दादा हे नेहमी काहीतरी परिवर्तन घडवत असतात. त्यानिमित्ताने आज नवीन पायदंडा हा दादांच्या माध्यमातून घातला गेला. मी नेहमी म्हणत असते की, पुणे हे स्त्री शक्तीचा आधार केंद्र आहे. जेवढ्या स्त्री शक्तीच्या चळवळी सुरू झाल्या. त्या पुण्यातून सुरू झालेल्या आहे. आजची ही नवीन सुरुवात देखील पुण्यातून झालेली आहे. आता आम्हाला सवित्री या घरोघरी दिसायला लागल्या आहे. आत्ता चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध जारी आहे. असे जोतिबांचा समाजात जास्तीत जास्त निर्माण व्हावे, अशा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देते असे वाघ म्हणाल्या होत्या.

हेही वाचा: Chitra Wagh On Chandrakant Patil : चित्रा वाघ यांनी केली चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना, नवीन वादाला फुटले तोंड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.