ETV Bharat / state

Remove Asaram Bapu Banner : बलात्कारी आसारामचे बॅनर हटवा; छात्रभारती विद्यार्थी संघटनेची मागणी

author img

By

Published : Feb 10, 2023, 6:50 PM IST

Remove Asaram Bapu Banner
Remove Asaram Bapu Banner

बलात्कारी आसाराम बापू बॅनर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देत यासंदर्भात छात्रभारती विद्यार्थी संघटनेने मागणी केली आहे. 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून नाही तर, 'मातृ-पितृ दिवस' म्हणून साजरा करावा असे बॅनर लावण्यात आले आहे. त्यावर विद्यार्थी भारती संघटना आक्रमक झाली आहे.

बलात्कारी आसारामचे बॅनर हटवा

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीत काही चौकांमध्ये आसाराम बापूंचे होल्डिंग लावण्यात आले आहेत. या विरोधात छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी आसाराम बापू यांचे बॅनर हटविण्याची मागणी केली आहे.

मातृ-पितृ दिवस साजरा करा : महापालिकेने हे सर्व होल्डिंग त्वरित काढण्याचे आदेश द्यावे असे निवेदन यावेळी देण्यात आले. या प्रसंगी उपाध्यक्ष अक्षय राउत, अनिकेत कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून नाही तर, 'मातृ-पितृ दिवस' म्हणून साजरा करावा. या आशयाचे त्यावर पोस्टर लावण्यात आले आहे.

व्हॅलेंटाईन डे वैयक्तिक प्रश्न : मातृ पितृ दिन' साजरा करावा किंवा 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, हा उपदेश बलात्कारी पुरुष असलेल्या ढोंगी आसारामचे नाव घेऊन देण्यात आला आहे. यावर आम्हाला आक्षेप आहे असे, यावेळी छात्रभारतीचे कार्याध्यक्ष प्रफुल कांबळे, सौरव शिंपी यांनी म्हटले आहे.

आसारामला जन्मठेपेची शिक्षा : गुजराथ येथील गांधीनगर कोर्टाने बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबद्दल दोषी सिध्द करून भोंदू आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अशा नराधामांमुळे आपल्या समाजात मुली असुरक्षित होतात, भीतीदायक वातावरणात जगतात. अशा गुन्हेगाराच्या नावाने शहरात फ्लेक्स लावणे, हि निराशादायक बाब आहे असे देखील यावेळी राजवीर थोरात म्हणाले.

आश्रमातल्या किती माता सुरक्षित : होल्डींगद्वारे आसाराम मातृ पितृ दिन साजरा करायचा संदेश देत आहेत. पण, त्याच्याच आश्रमातल्या किती माता सुरक्षित होत्या ? हे होल्डिंग अप्रत्यक्षपणे बलात्कारी पुरुषाचे गुणगान गात आहे. याने समाजामध्ये चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप विद्यार्थी छात्रभारती संघटनेने केला आहे.

व्हॅलेंटाईन डे का करतात साजरा ? व्हॅलेंटाईन डे, किंवा सेंट व्हॅलेंटाईन डे, 14 फेब्रुवारी रोजी जगभरात अ साजरा केला जाते. इंग्रजी भाषिक देशांमध्ये, हा एक पारंपारिक दिवस आहे. ज्यामध्ये प्रियकर, प्रेयशी व्हॅलेंटाईन फुले देऊन एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. मात्र हा दिवस का साजरा करतात तुम्हाला माहित आहे का? रोमन साम्राज्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली. व्हॅलेंटाईन डे प्रेमाच्या अभिव्यक्तीचा दिवस मानला जातो. संत व्हॅलेंटाईन यांचा बलिदान दिन म्हणून या दिवसाची ओळखला आहे. रोममधील राजा कॅलेडियसच्या कारकिर्दीत रोमन सैनिकांना लग्न करण्यास, प्रेम करण्यास बंदी होती. प्रेम हा फक्त टाईमपास असतो असा या राजाचा समज होता. त्यामुळे प्रेम करणाऱ्यांचाही राज्याला रोष होता. त्यामुळे याविरोधात संत व्हॅलेंटाईनने आवाज उठवत काही सैनिकांचे लग्न लावून दिले होते. त्यामुळे राजा कॅलेडियसला कळाल्यावर त्यांने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबले. तुरुंगात असतांना व्हॅलेंटाइन जेलरच्या मुलीच्या प्रेमात पडला. जेलरच्या मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे व्हॅलेंटाइनला 14 फेब्रुवारीला फाशी देण्यात आली. तेव्हापासून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन दिवस साजरा करण्यात येतो.

हेही वाचा - PM Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान मोदींच्या हस्ते अल्जामिया-तुस-सैफियाह अरबी अकादमीच्या मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.