ETV Bharat / state

पुणे : भाद्रपद बैलपोळ्यासाठी बाजारपेठा सज्ज

author img

By

Published : Sep 27, 2019, 5:38 PM IST

राजगुरुनगर बाजारपेठ

प्राचीन काळापासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये भाद्रपद अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा केला जातो. बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी उत्तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरची बाजारपेठ सजली आहे.

पुणे - पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरीप हंगाम जवळपास चांगला होत आला. मात्र, सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. प्रत्येक अडचणीच्या काळात बैल शेतकऱ्याच्या सोबत असतो. बैलाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलपोळा हा सण साजरा करतो. भाद्रपद पोळ्यासाठी उत्तर पुणे जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत.


काबाडकष्ट करून अन्नधान्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण महत्त्वाचा समजला जातो. प्राचीन काळापासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये भाद्रपद अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बळीराजा आपल्याकडे असणाऱ्या व मातीपासून तयार केलेल्या बैलांना सजवतो. त्यांची पूजा करून वाजत-गाजत मिरवणूक काढतो.

बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी राजगुरुनगरची बाजारपेठ सजली

हेही वाचा - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल, पिके बुडण्याच्या मार्गावर...

मातीचे बैल, बैलांसाठी गळ्यातील घुंगरूमाळा, कपाळाला बाशिंग, वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे, गळ्यातील माळा अशा विविध साहित्यांनी उत्तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरची बाजारपेठ सजली आहे. मात्र, काही ठिकाणी दुष्काळ, अतिवृष्टी आणि बाजारपेठेतील मंदी याचे सावट बैलपोळा सणावर जाणवते आहे.

Intro:Anc__ सध्या वरुणराजाच्या कृपेने खरीप हंगाम जवळपास चांगला आला मात्र पावसाची अतिवृष्टी वातावरणातील बदल व मागील काही दिवसांपूर्वीचा दुष्काळ यामुळे शेतकरी बळीराजा हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत होतं यातूनही बळीराजा सावरला आहे बळीराजाचा सोबती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाचा बैलाची कृतज्ञतेतून बैलपोळा हा सण साजरा होत असताना उत्तर पुणे जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत

शेतकऱ्यांना उत्साहित करणारा उत्सव म्हणजे बैलपोळा काबाडकष्ट करून अन्नधान्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण महत्त्वाचा मानला जातो या दिवशी बळीराजा आपल्याकडे असणाऱ्या व मातीपासून तयार केलेल्या बैलांना सजवतो व त्यांची पूजा करून वाजत-गाजत मिरवणूक काढत असतो याच बैलपोळ्यासाठी उत्तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर ही मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेत मातीचे बैल व बैलांसाठी गळ्यातील घुंगरू,माळ, कपाळाला बाशिंग, सिंगांना वेगवेगळ्या प्रकारची गोंडे आकर्षक रंगाने केलेली सजावट, गळ्यातील माळा अशा विविध साहित्यांचा साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे

पुरातन काळापासून शेती आणि शेतकरी असेच समीकरण रुजलेले आहे शेतीच्या अनेक कामांमध्ये बैलांचा खूप मोठा वाटा असतो त्यामुळे वर्षभर शेतामध्ये राहणाऱ्या बैलांची कृतज्ञता म्हणून प्राचीन काळापासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये भाद्रपद ती अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा केला जातोय मात्र सध्या संपूर्ण बाजारपेठांवर मंदीचं सावट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

दरम्यान भाद्रपद महिन्यातील हा बैलपोळा सण साजरा होत असताना या शेतकऱ्यांच्या सणावर मंदीचं सावट तयार झाला असून मोठ्या उत्साहात साजरा होणारा बैलपोळा कुठेतरी अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे


Body:...


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.