ETV Bharat / state

Maharashtra Weather Update : पुढील चार दिवसात राज्यातील 'या' भागात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

author img

By

Published : Mar 13, 2023, 8:39 PM IST

राज्यातील अनेक भागात येत्या 14 मार्च ते 17 मार्चपर्यंत गारपीटसह पावासाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अलीकडेच महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Weather Update
डॉ. अनुपम कश्यपी माहिती देताना

डॉ. अनुपम कश्यपी माहिती देताना

पुणे : उन्हाळ्याच्या पहिल्या दिवसापासून राज्यभर उन्हाचे चटके बसत असताना मागच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी गारपीठांसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. असे असले तरी येत्या 15 मार्च ते 17 मार्च दरम्यान देखील राज्यातील अनेक ठिकाणी गारपीटसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण झाली आहे.

या ठिकाणी पडणार पाऊस : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार कोकण व गोवा या ठिकाणी 14 मार्च ते 17 मार्च पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह विजांच कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात 14 मार्च ते 17 मार्च पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व गारपीट होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा या ठिकाणी देखील 14 मार्च ते 17 मार्च पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व गारपीट होण्याची शक्यता आहे. आणि विदर्भ या ठिकाणी देखील 14 मार्च ते 17 मार्च पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह विजांच कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान : मागील काही दिवसांत शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार मागील आठवड्यात अवकाळी पावसामुळे साधारणत: पाच त सहा हजार हेक्टरवरील शेत मालाचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. यामध्ये उत्तर महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे गारपीट देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव तसेच नंदुरबार येथे शेतमालाचे नुकसान झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या या अवकाळी पावसामुळे इतरही जिल्ह्यांना फटका बसला होता. दरम्यान, आत्ता पुन्हा एकदा हवामान विभागाच्या वर्तविण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला असून पुन्हा एकदा संकट ओढवणार की काय, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

हेही वाचा : Agriculture Minister Abdul Sattar : शेतकरी आत्महत्या आजच्या नाहीत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वादग्रस्त वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.