पुणे Pune Murder News : पुण्यातील हडपसर भागामध्ये पूर्ववैमनस्यतून 17 वर्षीय मुलाची धारदार लोखंडी हत्याराने वार करून हत्या करण्यात आलीय. सहा ते सात जणांच्या टोळक्यानं हा हल्ला केला होता. यात या मुलाचा खून झालाय. या प्रकरणी विठ्ठल महादेव झुंबर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सहा जणांकडून हल्ला : याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विठ्ठल झुंबर्डे यांचा मुलाला आरोपीने संगनमत करून, पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्याराने स्वप्नीलयाच्या डोक्यावर हल्ला करून ठार मारले. तसेच यातील दोन आरोपींनी त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्यारे हवेत फिरवून, आमच्यासोबत कोणी पंगा घेतला तर असाच एक एकाचा मुडदा पाडू असं बोलून परिसरात दहशत पसरवलीय. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील सहा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सनी रावसाहेब कांबळे, अमन साजिद शेख, आकाश हनुमंत कांबळे, जय शंकर येरवळे, तौफिक रज्जाक शेख, शाहरुख साजिद शेख, अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
घटनेमुळं दहशतीचं वातावरण : एकीकडं पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात झाडाझडती न केल्यानं अनेक नोंदीवरील गुन्हेगार त्यांना सापडले नाहीत. परंतु, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी धारदार शस्त्रानं हल्ला केल्यानं गुंडांनी पुण्यात मोठी दहशत निर्माण केलीय. यामुळे पुणे पोलिसांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. पुण्यातील वेगवेगळ्या भागात सातत्यानं असे प्रकार घडत असून पोलिसांना मात्र यात अपयश येताना दिसतंय. कितीही उपाययोजना केल्या तरही पुणे पोलीसांकडून गुन्हेगारी आटोक्यात येताना दिसत नाही. यामुळे गुन्हेगारांचे मात्र दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचं दिसतय.
हेही वाचा :