ETV Bharat / state

Pune MIDC Fire : कंपनी मालक निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

author img

By

Published : Jun 9, 2021, 4:59 PM IST

Pune MIDC Fire : कंपनी मालक निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी
Pune MIDC Fire : कंपनी मालक निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पिरंगुट एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहा (वय 39 रा. सहकारनगर) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - पिरंगुट एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहा (वय 39 रा. सहकारनगर) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री त्याला अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर निकुंज शहा याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आगी प्रकरणी निकुंज शहा याच्यासह बिपिन शहा (वय 68) पुणे केयुर बिपिन शहा (वय 41) त्यांच्या विरोधातही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशी समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई
पिरंगुट येथील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या आगीप्रकरणी कामगारांच्या मृत्यूला कंपनी मालकाला जबाबदार धरत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. आगीच्या या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

गुन्हा गंभीर स्वरूपाचा

दरम्यान कंपनी मालक निकुंज शहा याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील निलेश लडकत यांनी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून या प्रकरणातील आणखी दोन आरोपी तिला अटक करायचे असल्याचे सांगत आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद करत आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीच्या बाजूने ऍड हर्षद निंबाळकर यांनी काम पाहिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.