ETV Bharat / state

Double Dream of India : जिल्हा टेनिस संघटनेचा डबल ड्रीम इंडिया उपक्रम; दुहेरीतील सर्वोत्तम खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न

author img

By

Published : Jan 4, 2023, 5:13 PM IST

Double Dream of India
डबल ड्रीम इंडिया

पदक विजेते टेनिसपटू घडविण्याचे या योजनेचे उद्दिष्ट ( initiative to produce best doubles Tennis Players ) ठेवून पुण्यात अनोखा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. डबल ड्रीम इंडिया उपक्रम सुरू करण्यात येत ( Double Dream of India ) आहे. पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंची खास तयारी करून घेत आहे.

डबल ड्रीम इंडिया

पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटनेने (Pune Metropolitan District Tennis Association ) नवा उपक्रम हाती घेतला आहेत. देशातील दुहेरीतील सर्वोत्तम खेळाडू घडविण्यासाठी आणि निवडक खेळाडूंना सक्षम बनविण्यासाठी डबल ड्रीम इंडिया हा ( Double Dream of India ) उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक स्तरावरील स्पर्धेत विजेतेपद मिळविणे आणि अखेरीस ऑलिम्पिक पदकाचे लक्ष्य अशी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम बनविण्यात आला आहे.

ऑलिम्पिक पदकाचे लक्ष्य : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटनेने या कार्यक्रमात रोहन बोपण्णाला जोडून घेतले असून, त्याची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. एटीपी क्रमवारीत दुहेरीमध्ये पहिल्या दोनशेमध्ये असलेल्या खेळाडूंना या कार्यक्रमाचा फायदा होणार आहे. पत्रकारपरिषदेत केपीआयटीचे अध्यक्ष आणि पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, सचिव सुंदर अय्यर, सचिव अभिषेक ताम्हाणे, खजिनदार कौस्तुभ शहा, डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील, सचिव सुंदर अय्यर, अभिषेक ताम्हाणे, कौस्तुभ शहा या पदाधिकार्यांच्या माध्यमातून देशाचा लौकिक उंचावणारे पदक विजेते टेनिसपटू घडविण्याचे या योजनेचे उद्दिष्ट ( initiative to produce best doubles Tennis Players ) आहे.

रोहन बोपण्णाकडून सहकार्य : याविषयी अधिक माहिती देताना केपीआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सांगितले की, 'या उपक्रमाची सुरुवात आम्ही एप्रिल 2022 पासून सुरु केली. तेव्हा हा एक प्रायोगिक प्रकल्प होता. आम्ही एटीपी युरोप, अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत होणाऱ्या चॅलेंजर्स मालिकांवर लक्ष्य केंद्रित केले. निवडक भारतीय खेळाडूंना आम्ही या प्रवासात एक उत्तम फिजिओ आणि प्रशिक्षण सुविधा पुरवत गेलो. या योजनेत रोहन बोपण्णाकडून खूप सहकार्य झाले. त्याने आपल्या संपर्कातून जगभरात ही मोहिम चांगली कार्यान्वित केली. एकत्र येऊन आम्ही विजेते टेनिसपटू घडविण्यासाठी काही ठोस उपक्रम राबवू शकलो,याचा आम्हाला अभिमान वाटतो. या योजनेतून भारताच्या रामकुमार रामनाथन, दिविज शरण, साकेत मायनेनी, युकी भाम्ब्री अशा दर्जेदार खेळाडूंना आम्ही मदत पुरवू शकलो. या सर्व खेळाडूंनी आमच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे,' असे किशोर पाटिल यांनी सांगितले.

भारतीय 10 खेळाडूंना योजनेचा फायदा : या योजनेचा फायदा मिळणाऱ्या भारतीय 10 खेळाडूंमध्ये सध्या रामकुमार रामनाथन, साकेत मायनेनी, युकी भाम्ब्री, एन. श्रीराम बालाजी, दिविज शरण, अर्जुन कढे, पूरव राजा, जीवन एन, रोहन बोपण्णा, अनिरुद्ध सी. अशा खेळाडूंचा समावेश आहे. या पैकी बहुतेक खेळाडू हे स्वतः प्रवास करतात. त्यामुळे त्यांना स्पर्धा सुरु असताना आवश्यक पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे अशाच एखाद्या कार्यक्रमाची गरज होती. चॅलेंजर मालिकांमध्ये खेळताना हा कार्यक्रम त्यांच्यासाटी खूप उपयुक्त ठरतो, असे पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटनेचे सरचिटणीस सुंदर अय्यर यांनी सांगितले. प्रायोगित स्वरपात केलेल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे आम्हाला मोठ्या योजनेकडे वळण्यासाठी आणि अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. या योजनेचा विस्तार अधिक करण्यासाठी पुणे शहर जिल्हा टेनिस संघटनेने अॅव्हेन्यूज कॅपिटल या कंपनीला नवे प्रायोजक म्हणून या योजनेत जोडून घेतले. यामुळे या मोहिमेला भारतीय मोहिमेसाठी एक व्यापक स्वरुप प्राप्त झाले.

प्रशिक्षण शिबिराचे आयोजन : अलिकडेच दुबईत सर्व खेळाडूंसाठी नव्या हंगामापूर्वी एका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे सर्व खेळाडू एकाच वेळे एका छताखाली आले. हो शिबिर १२ ते २३ डिसोबर दरम्यान पार पडले. दुहेरीतील सर्वोत्तम प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेतील जेफ कोएत्झी यांचे प्रमुख मार्गदर्शन या खेळाडूंना मिळाले. सहाय्यक प्रशिक्षक म्हणून एम. बालचंद्र यांच्यासह तीन फिजिओंची त्यांना मदत झाली. शिबिरात १३ भारतीय आणि ३ परदेशी खेळाडूंचा समावेश होता, अशी माहिती रोहन बोपण्णाने दिली. या योजनेसाठी प्रवासी फिजिओ आणि प्रशिक्षक संकल्पनेला चालना देण्यात रोहनचा प्रमुख वाटा आहे. पुरुष खेळाडूंना मदत दिल्यानंतर आता २०२३ मध्ये पुरुष खेळाडूंबरोबर दुहेरीतील महिला खेळाडूंनाही या योजनेचा लाभ मिळेल. या वर्षी आशियाई स्पर्धा होणार आहेत. उपक्रमातील खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत पदक जिंकावे आणि देशाचा गौरव उंचवावा यासाठी या योजनेतून पुढाकार घेतला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.