ETV Bharat / state

Pune Accident News: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीला वाचविण्याच्या नादात खासगी बस उलटली, दहा प्रवासी जखमी

author img

By

Published : Apr 25, 2023, 10:01 AM IST

Updated : Apr 25, 2023, 10:11 AM IST

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीला वाचविण्याच्या नादात खाजगी बस उलटली. यामध्ये दहा प्रवासी जखमी झाले आहेत.

Pune Accident News
खाजगी बसचा अपघात

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या दौंड तालुक्यातील भांडगाव येथे एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात एक खाजगी प्रवासी बस पलटी झाली. या अपघातात १० प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर महामार्गावर काही वेळ मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी आहे. हा अपघात सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. तातडीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना रूग्णालयात हलविण्यात आले.


जखमी प्रवासी : हा अपघात घडला त्यावेळी बसमध्ये एकूण ३८ प्रवासी प्रवास करीत होते. जखमी झालेल्या दहा प्रवाशांमध्ये चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात राहुल गंगाधर तरटे (रा. नर्सीगरोड नांदेड), नेहारीका नागनाथ हांडे, शंकुतला दिंगबर वाळके, साक्षी नागनाथ हांडे (तिंन्ही रा.देहु आळंदी पुणे), विग्नेश रमेश गकुला (रा.उमरगा जि.धाराधीव), पुष्पराज हनुमंतराव पाटील (रा. गुरूनिवास श्रीनगर नरसिंगरोड ता.मुखेड जि.नांदेड), ऐरना जठार गुमेरला (रा.चेंगल ता.विमगल जि.निजामबाद) हे जखमी झाले आहेत. माणिकेम मुतीराज जकाला, मुनीराज मुताबा जकाला दोन्ही मुंबईमधील रहिवाशी आहेत. सुलोचना कृष्णा रेड्डी (रा.उपरमाल्याना ता.गंगाधरा जि.करीमनगर) हे जखमी झाले आहेत.


बस महामार्गावर पलटी झाली : पुणे सोलापूर महामार्गावर एका खासगी ऑरेंज कंपनीची प्रवासी बस मुंबई ते निजामाबादच्या दिशेने जात होती. तेव्हा ती बस दौंड तालुक्यात पुणे - सोलापूर महामार्गावर भांडगाव गावच्या हद्दीत आली असताना अचानक दुचाकीस्वार समोर आला. त्या बस चालकाने त्या दुचाकी चालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले असता त्याचीच बस महामार्गावर पलटी झाली. यात १० जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी तातडीने जखमींना उपचारासाठी चौफुला व यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर रूग्णालयांत उपचार सुरू आहे.

हेही वाचा : Accident At Malshej Ghat: माळशेज घाटात भीषण अपघात! इनोव्हा आणि पिकअपच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Last Updated :Apr 25, 2023, 10:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.