ETV Bharat / state

आजही मुलींना आपलं करिअर निवडण्यासाठी संघर्ष करावा लागतो- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 1:33 PM IST

Updated : Nov 30, 2023, 1:59 PM IST

President Murmu Visit To NDA
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

President Murmu Visit To NDA : पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात राष्ट्रीय संरक्षण अकादमीचा दीक्षांत संचलन सोहळा आज (30 नोव्हेंबर) पार पडला. एनडीएतील क्षेत्रपाल मैदानावर हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. दरम्यान, या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित होत्या.

पुणे President Murmu Visit To NDA : राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यादरम्यान बोलत असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, मागील वर्षीपासुन एनडीएत महिलांचं देखील प्रशिक्षण सुरू झालंय आणि आज पहिल्यांदा या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये महिला कॅडेट्स सहभागी झाल्यात. त्यामुळं हा दिवस ऐतिहासिक आहे. तसंच मला विश्वास आहे की सर्व महिला कॅडेट्स देशाचं आणि एनडीएचं नाव पुढं घेऊन जातील. आजही मुलींना त्यांच्या आवडीचं करिअर निवडण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि यामुळं या महिला कॅडेट्सना खूप खूप शुभेच्छा आहे. दरम्यान, यावेळी राज्यपाल रमेश बैस तसंच एनडीएचे विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते.


या संस्थेनं देशाला महान पुत्र दिलेत : "आज या युवा कॅडेट्सला बघून माझं हृदय गर्वानं भरलंय. या संस्थेनं देशाला महान पुत्र दिलेत. जे देश सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. तसंच ही प्रशिक्षण संस्था देशाच्या उत्कृष्ठ संस्थांपैकी एक आहे. येथून पास आऊट होणारे लोक देशाच्या सेवेसाठी तयार झाले आहे. भारताची शांती, स्थिरता, आणि समृद्धी यासाठी सीमेवरील आणि आंतरिक सुरक्षा महत्त्वाची आहे. पूर्वीपासून आपण 'वसुधैव कुटुंबकम्' या परंपरेला मानत आलो आहोत. परंतु आपली सेना देशाच्या अखंडतेला हानी पोहोचवणाऱ्या बाहेरील तसंच आतील शत्रूंशी सामना करण्यासाठी सदैव तयार आहे," असंही द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.


लढाऊ विमानांनी वेधलं सर्वांचं लक्ष : दरम्यान, पहाटेच्या रम्य वातावरणात बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील 'क्वाटर डेक'चा दरवाजा उघडला. त्यानंतर या दरवाजातून लष्करी बॅण्डचं आगमन झालं. त्यापाठोपाठ अकादमीच्या कॅडेट्सच्या मैदानावर झालेल्या परेड्समुळं उपस्थितांच्या अंगावर शहारा आला. चेतक हेलिकॉप्टर, जॅग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं.

हेही वाचा -

  1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुण्यात; राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 145 व्या तुकडीचं दिमाखदार संचलन, राष्ट्रपतींची उपस्थिती
  2. योग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग - द्रौपदी मुर्मू
  3. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिशिंगणापूर दौऱ्यावर; शनिदेवाच्या चौथऱ्यावरुन घेणार दर्शन
Last Updated :Nov 30, 2023, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.