ETV Bharat / state

Kasba Bypoll : कसबा मतदारसंघात पोस्टरबाजी; कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?

author img

By

Published : Feb 6, 2023, 4:07 PM IST

Updated : Feb 6, 2023, 6:07 PM IST

कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी वाटपावरून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. 'कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का?' अशा आशयाचा मजकूर लिहिलेले बॅनर्स कसबापेठेत लागले आहेत. त्यामुळे कसब्यात भाजपविरोधातील नाराजी उफाळून आल्याचे दिसत आहे.

Kasaba Bypoll
कसबा पोटनिवडणूक

कसबा मतदारसंघात उमेदवारी वाटपावरून लागलेले बॅनर्स

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भाजपने माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. पण आता टिळकांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने घराबाहेरील उमेदवार दिल्याने मोठी नाराजी उफाळल्याचे चित्र आहे.

उमेदवारी वाटपावरून पोस्टरबाजी : मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी देखील याबात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा भाजपमधील नाराजी नाट्य उघड झाले आहे. 'कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का?' अशा आशयाचा मजकूर लिहिलेले बॅनर्स कसबापेठेत लागले आहेत. त्यामुळे कसब्यात भाजपविरोधातील नाराजी उफाळून आल्याचे दिसत आहे.

ब्राम्हण समाज नाराज? : ब्राह्मण समाज हे नाराज झाला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आज ब्राम्हण समाजाच्या काही लोकांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी जाऊन शैलेश टिळक यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत कसबा पोट निवडणुकीत आम्ही ब्राह्मण समाज एकतर नोटाला मतदान करू नाहीतर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, अशी भूमिका समाजाने घेतली आहे.

उमेदवारांकडून अर्ज दाखल : कसबा पोटनिवडणुकीत आज भाजपकडून हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यापूर्वीच कसब्यात 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला... टिळकांचा मतदारसंघ गेला... आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?' अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचेही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलेले आहे.


गिरीश बापट यांच्या जागी नवा चेहरा? : विधानसभा निवडणुक 2019 मध्ये कोथरूडच्या स्टँडिंग आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तर आता या पोटनिवडणुकीत टिळकांचे तिकीट कापत ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे. दुसरीकडे आजारी असलेले भाजप खासदार गिरीश बापट यांना देखील डावलून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप नवीन चेहरा देण्याचा तयारीत असल्याने, असे बॅनर कसब्यात लागले आहेत.

कुटुंबियांना का डावलेले ? : आजारी असतानाही राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुक्ता टिळक मतदानाला मुंबईत आल्या होत्या. रुग्णवाहिकेतून त्या आल्या होत्या. पक्षासाठी एवढी निष्ठा दाखवूनही त्यांच्या कुटुंबीयांना का डावलले गेले आहे? असा प्रश्न कसब्यात विचारला जात आहे. यावरूनच शैलेश टिळक यांनी उघड नाराजी बोलून दाखवली होती.

मुक्ता टिळकांचे योगदान : आजाराची झुंज देताना देखील आमदार मुक्ता टिळक यांनी आपल्या पक्षासाठी योगदान दिले. मात्र पक्षाकडून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न देता दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे. ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला डावलून भाजपकडून दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली आहे. आमचा पक्षाला प्रश्न आहे की आमच्या समाजातील एक गठ्ठा मत तुम्हाला हवा आहे. पण आमचा उमेदवार नको आहे याचे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाने आम्हाला द्यावे, असे यावेळी ब्राह्मण समाजाच्या नागरिकांनी म्हटले आहे.

अन्यथा आमचा उमेदवार उभा करू : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यापासून त्यांनी हा पायंडा सुरू केलेला आहे.आत्ता हा पक्षच बदलाय की काय अस प्रश्न आम्हाला निर्माण झालं आहे.आज आमचा समाज हा नाराज असून आम्ही या निवडणुकीतच आमची नाराजगी दाखवणार आहोत. एक तर आम्ही नोटाला मतदान करू किंवा आम्ही आमचा उमेदवार उभ करू, असे देखील यावेळी म्हटले आहे.

हेही वाचा : PM Modi Watch Final Match : पंतप्रधान मोदींनी पाहिला जयपूर महाखेलचा अंतिम सामना; आर्थिक दुर्बल खेळाडूंना मिळणार सरकारची मदत

Last Updated : Feb 6, 2023, 6:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.