ETV Bharat / state

Pune Crime News: पुणे जिल्ह्यात अफूची शेती, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; आठ दिवसांमध्ये पोलिसांची दुसरी कारवाई

author img

By

Published : Mar 19, 2023, 11:08 AM IST

Pune Crime News
आंबेगाव तालुक्यात अफूची शेती

पुणे जिल्ह्याती अफूची शेती करणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सुरू आहे.

आंबेगाव तालुक्यात अफूची शेती

पुणे : दिवसेंदिवस राज्यात अफू, गांजा या शेतीचे प्रमाण वाढत चालले आहे. नुकतेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील गंगापूर गावामध्ये आफुची शेती करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. आठ दिवसांमध्ये ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात अफूच्या शेतीचे प्रमाण किती आहे, हे आता पोलिसांना शोधावे लागणार आहे. कारण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी पुणे जिल्ह्यात अफूची शेती होताना दिसत आहे.



दोन लाखांचा मुद्देमाल जप्त : याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मोजे गंगापूर येथे आरोपी यांच्या शेतामध्ये एक लाख 87 हजार पाचशे रुपये किमतीचे अफूचे झाड शेतामध्ये आढळून आले आहे. यावेळी अफुची शेती करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, बी बियाणेसुद्धा पोलिसांना तपासात सापडले आहे. तब्बल दोन लाख रुपयांचा अफूच्या शेतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे.


गुन्हा दाखल : या संदर्भामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल महादेव चव्हाण (वय 35 वर्ष) घोडेगाव पोलीस स्टेशन यांनी आरोपी विरोधांत गुन्हा दाखल केला आहे. हरिभाऊ रामा मधे (वय 72 वर्ष) यांच्या शेतामध्ये हा माल सापडला. 18 मार्च रोजी साडेचारच्या सुमारास मोजे गंगापूर, तालुका आंबेगाव जिल्हा पुण्याच्या गावच्या हद्दीतील शेतामध्ये हा सगळा माल जप्त करण्यात आला. आरोपी विरोधात वेगवेगळ्या कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


पोलिसांकडून कडक कारवाई : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या अफूच्या शेतीचे पीक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर आता पोलिसांकडून कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातली ही दुसरी कारवाई आहे. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : Pune Crime : औषधे वाहतूकीच्या नावाखाली अवैधरीत्या होणाऱ्या विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई, ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.