ETV Bharat / state

शिरुरमध्ये महाविद्यालयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी पोलिसांकडून तरुणाला बेदम मारहाण

author img

By

Published : Aug 18, 2019, 11:28 AM IST

महाविद्यालयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये या तरुणाला पोलिसांकडून बेदम मारहाण होत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओची तपासणी करून चौकशी सुरु असल्याचे शिरुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.

शिरुरमध्ये महाविद्यालयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी पोलीसांकडून तरुणाला बेदम मारहाण

पुणे - महाविद्यालयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली. यामध्ये या तरुणाला पोलिसांकडून बेदम मारहाण होत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओची तपासणी करून चौकशी सुरु असल्याचे शिरुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.

शिरुरमध्ये महाविद्यालयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी पोलीसांकडून तरुणाला बेदम मारहाण

योगेश खले असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणी व योगेश हे दोघेही शिरुर तालुक्यातील महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत आहेत. योगेशकडून अनेकवेळा पीडित मुलीची छेडछाड होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी योगेशला मांडवगण फराटा येथील आऊटपोस्टला बोलावून तंबी दिली. मात्र, त्याच ठिकाणी योगेशला पोलिसांनी खुप मारल्याचे योगेशने सांगितले.

योगेश खले या तरुणाला मारहाण झाल्याचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर शिरुर पोलिसांकडून योगेशवर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून महाविद्यालयीन तरुणीची वारंवार छेडछाड केली जात असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी योगेशला पोलीस खुप मारत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे पोलिसांवर नाराजीचा सुर उमटत आहे. याबाबत वायरल झालेल्या व्हिडीओची वरिष्ठ पातळीवर तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण सारंगकर यांनी माध्यांशी बोलताना सांगितले.

Intro:Anc__शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे महाविद्यालयीन मुलीची छेडछाड करणा-या तरुणाला पोलीसांकडुन मारहान केल्याची विडिओ क्लिप वायरल झाली आहे यामध्ये या तरुणाला पोलीसांकडुन बेदम मारहाण झाली असल्याचे दिसत आहे मात्र पोलीसांना या विडिओवर संभ्रम निर्माण करत चौकशी सुरु असल्याचे शिरुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले...योगेश मचाले असे मारहान झालेल्या तरुणाचे नाव आहे

पिडित तरुणी व योगेश हे दोघेही शिरुर तालुक्यातील महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत असुन योगेश कडुन अनेक वेळा पिडित मुलीची छेडछाड होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यावेळी पोलीसांकडुन योगेश याला मांडवगण फराटा येथील आऊटपोस्ट ला बोलावुन तंबी देण्यात आली मात्र त्याच ठिकाणी योगेश याला पोलीसांकडुन जबर मारहाण करण्यात आल्याचे योगेश याने सांगितले...


Byte__योगेश मचाले__तरुण

योगेश मचाले या तरुणाला मारहाण झाल्याचा विडिओ व्हायरल झाल्यानंतर शिरुर पोलीसांकडुन योगेश वर पिडित तरुणीच्या तक्रारीवरून महाविद्यालयीन तरुणीची वारंवार छेडछाड केली जात असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र एखाद्या जनावराला अशी मारहाण केली जात नाही अशा पद्धतीने शिरुर पोलीसांकडुन मारहाण झाल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र नाराजीचा सुर उमटत आहे.

असुन याबाबत व्हायरल झालेल्या विडिओची वरिष्ठ पातळीवर तपासणी करण्यात येणार असल्याचे नारायण सारंगकर पोलीस निरीक्षक शिरुर यांनी माध्यांशी बोलताना सांगितले...

Byte__नारायण सारंगकर__पोलीस निरीक्षक शिरुर.Body:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.