ETV Bharat / state

Sharad Pawar on Ajit Pawar : अशा भेकड लोकांना जनताच जागा दाखवेल: शरद पवारांचा बंडखोरांवर हल्लाबोल

author img

By

Published : Aug 20, 2023, 9:29 PM IST

Updated : Aug 20, 2023, 10:35 PM IST

Sharad Pawar Criticized Ajit Pawar
शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षांतर केलं म्हणजे काय तर भाजपाच्या मांडीवर जाऊन बसले. त्यांची जागा जनता त्यांना दाखवेल. ईडी आणि सीबीआय या संस्थेच्या (Sharad Pawar on Ajit Pawar) भीतीने हे सगळे लोक तिकडे गेले. त्यांच्या प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या चौकशा भाजपाकडून करण्यात आल्या. त्यामुळे अशा भेकड लोकांना जनताच मतदानातून जागा दाखवेल, अशी टीका शरद पवार यांनी पुण्यात केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया

पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचं रविवारी एक दिवसाचं अधिवेशन भरवण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार मार्गदर्शन करत होते. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आता जशास तसे उत्तर देणं गरजेचं आहे. सत्तेचा गैरवापर करून (Sharad Pawar on Ajit Pawar) खोटे गुन्हे दाखल केले जातात. ट्रोल केले जात आहे. त्या विरोधात आपणही आपल्या विचाराचा प्रभाव वाढवला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांच्या सोबत आहे. त्यांच्या कायदेशीर लढाईसाठी तयार आहे. त्यांना सर्व मदत दिली जाईल. आपली बाजू भक्कमपणे मांडून जशास तसे उत्तर द्यावे, असा आदेश शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

भेकड लोकांना जनता जागा दाखवेल : केंद्रातील भाजपा सत्तेचा गैरवापर करून चुकीचे पायंडे पाडत आहे. त्यांना एवढीच भीती दाखवण्यात आली की, तुम्ही आमच्या बाजूला या नाहीतर तुमची जागा दुसऱ्या ठिकाणी आहे. दुसऱ्या ठिकाणची जागा म्हणजे कारवाई होणे आहे. ती होऊ नये यासाठी हे सगळे लोक (राष्ट्रवादी बंड) तिकडे गेले. अशा भेकड लोकांना जनता जागा दाखवत असते आणि त्यांची जेलमध्ये जायची तयारी नसल्याने ते गेले असल्याचे शरद पवार म्हणाले.

पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा : शरद पवार म्हणाले की, कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा फायदा कमी केलेला आहे. हे सरकार जनहिताच्या विरुद्ध निर्णय घेत आहे, ते लोकांना समजावून सांगणे गरजेचे आहे. 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर फाळणी झाली होती. त्यावेळी देखील सीबीएससी बोर्डाने एक नवीन अध्यादेश काढला होता. त्या फाळणीचा इतिहास अभ्यासक्रमामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे देशाला काळीमा फासणारा इतिहास युवा पिढीला शिकवून आपण द्वेष निर्माण करत आहोत. हे सगळे विषय आपण समाजात घेऊन यावर तुम्ही सर्वांनी बोलावे. यापुढे जर तुमच्यावर कुठले गुन्हे दाखल झाले तर पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही शरद पवार यांनी सोशल मीडिया सेलला दिली.

आता त्यांना भाजपाचे गुणगाण करावे लागतं : काही दिवसांपूर्वी भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांना आता प्रत्येक वेळी भाजपाच्या नेत्यांचे गुणगान करावे लागणार आहे. भाजपाच्या बाजूने मतदान करावं लागणार आहे, भाजपाच्या मार्गाने जावं लागणार. त्यामुळे एका भीतीपोटी या नेत्यांना हे करावं लागलं, असा जोरदार हल्ला शरद पवार यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांवर केला आहे.

हेही वाचा:

  1. Minority Scholarship Scam : अल्पसंख्याक शिष्यवृत्तीत मोठा घोटाळा उघडकीस, 53 टक्के संस्था बनावट आढळल्या; CBI करणार चौकशी
  2. CWC : कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा, महाराष्ट्रातून कोणाची वर्णी?
  3. Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं खुशाल कोर्टात जा, मी वकील देतो; संजय राऊतांचा टोला
Last Updated :Aug 20, 2023, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.