ETV Bharat / state

देशांतर्गत विमानसेवेच्या माध्यमातून दोन दिवसात 1 हजार 167 प्रवासी पुण्यात दाखल

author img

By

Published : May 27, 2020, 8:14 AM IST

देशांतर्गत 25 मे पासून सुरू करण्यात आलेल्या विमानसेवेदरम्यान, गेल्या 2 दिवसांत पुण्यात 1 हजार 167 प्रवाशांचे आगमन झाले आहे. पुणे विमानतळावर उतरणाऱ्या या प्रवाशांना पुणे महानगरपालिकेमार्फत थर्मल स्क्रिनिंग तसेच होम क्वारंटाईन सील ॲन्ड हेल्प डेस्कची सुविधा 24 X7 करण्यात आली आहे.

पुणे विमानतळावर 1167 प्रवासी पुण्यात दाखल
पुणे विमानतळावर 1167 प्रवासी पुण्यात दाखल

पुणे - देशांतर्गत विमानसेवेला 25 मे पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. 25 मे रोजी पहिल्याच दिवशी 11 विमानाने 823 तर, 26 मे रोजी 8 विमानाने 344 प्रवासी असे एकूण 1 हजार 167 प्रवाशांचे पुणे विमानतळावर आगमन झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

देशांतर्गत 25 मे पासून सुरू करण्यात आलेल्या विमानसेवेदरम्यान, गेल्या 2 दिवसांत पुण्यात 1 हजार 167 प्रवाशांचे आगमन झाले आहे. पुणे विमानतळावर उतरणाऱ्या या प्रवाशांना पुणे महानगरपालिकेमार्फत थर्मल स्क्रिनिंग तसेच होम क्वारंटाईन सील ॲन्ड हेल्प डेस्कची सुविधा 24X7 करण्यात आली आहे.

पुणे विमानतळावर प्रवाशांचे आगमन
पुणे विमानतळावर प्रवाशांचे आगमन

पुणे विमानतळ येथे उतरणाऱ्या नागरिकांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांची तर त्यांच्या सहाय्याकरीता प्र. सहाय्यक जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.