ETV Bharat / state

Raj Thackeray News: जागतिक व्यंगचित्र दिवसानिमित्त राज ठाकरेंनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले...

author img

By

Published : May 5, 2023, 12:42 PM IST

Raj Thackeray News
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज पक्षाचे अध्यक्ष कोण होणार? याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे, असे असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका कार्यक्रमात अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले. त्यांना गप्प राहण्याच सल्ला दिला आहे.

मी व्यंगचित्रंमध्य रमणारा माणूस- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

पुणे : 5 मे आज जागतिक व्यंगचित्र दिवस आहे. आज पुण्यात बालगंधर्व कलादालन येथे युवा संवाद संस्थेच्या वतीने पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यांचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून तसेच पक्षाच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर पक्षाचे नेते तसेच कार्यकर्ते हे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर पवार यांनी निवड समिती जो काही निर्णय घेईल, तो मान्य असेल असे सांगून दोन दिवसाची वेळ मागितली होती.

अजित पवार यांना गप्प राहण्याचा सल्ला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष निवड समितीची बैठक आज सकाळी 11 वाजता होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते मुंबईतील प्रदेश कार्यालयात दाखल झाले आहेत. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आग्रही आहेत. अश्यातच राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे व्यंगचित्र काढून अजित पवार यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवारांच्या राजीनामुळे मोठा राजकीय भूकंप झालेला आहे.


मी व्यंगचित्रांमध्ये रमणारा माणूस : यावेळी ठाकरे म्हणाले की, आज मी पुण्यावरून रत्नागिरीला जाणार होतो. पण आज जात असताना माझे मित्र चारुदास पंडित याने मला मध्येच टोल भरायला लावला आहे. जागतिक व्यंगचित्र दिवस म्हटल्यावर आज येणे स्वाभाविक होते. इथे जगभरातील व्यंगचित्र आहेत. ते आज मी इथे आल्यावर पाहत होतो. व्यंगचित्र पाहिले की, माझे हाथ शिवशिवतात, पण वेळ आणि बैठक न भेटत असल्याने ती व्यंगचित्र माझ्या भाषणातून पुढे येतात. त्या दिवशी मला कोणीतरी प्रश्न विचारला की, राजकारण की व्यंगचित्र तर मी म्हणालो की व्यंगचित्र. कारण मी व्यंगचित्रांमध्ये रमणारा माणूस आहे, असे यावेळी राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : Raj Thackeray Met CM Shinde : राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन, सिडको संदर्भात चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.