ETV Bharat / state

मोदी सरकार नामर्द, कांद्यामुळंच वाजपेयींचं सरकार....; बच्चू कडूंचा घरचा आहेर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2023, 7:28 PM IST

Updated : Aug 22, 2023, 8:09 PM IST

कांद्यावरील निर्यात शुल्कावरून आमदार बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पिकवणाऱ्याचा विचार सरकार का करत नाही असा सवाल कडू यांनी केला. कांदा न खाल्ल्यास लोक मरणार नाहीत. कांद्याचे भाव वाढल्याने अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कोसळले होते. त्यामुळे सरकार डिसेंबरची व्यवस्था आजच करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

MLA bachchu Kadu
MLA bachchu Kadu

बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवड : सरकारच्या अस्तित्वासाठी केवळ ग्राहकांचाच विचार करण्यात आला आहे. कांदा न खाल्ल्यास कोणी मरणार नाही. मात्र, फक्त शेतकऱ्यांचे नुकसान का? असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी सरकारला विचारला आहे. कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याची गरज नव्हती. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची व्यवस्था सरकार आजच करुन ठेवतंय. सरकार एव्हढे नालायक कसे? कांद्याचे भाव वाढल्याने अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार कोसळलं होतं? त्यामुळे हे नामर्द सरकार असं करत असल्याचा आरोप आमदार कडू यांनी केला आहे. तसेच येणाऱ्या काळात सरकारचा निषेध करणार असल्याचं आमदार कडू यांनी म्हटलं आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 'दिव्यांगांच्या दारी' या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कांदा न खाल्ल्यास कोणी मरणार नाही : चिंचवडमध्ये अपंग कल्याण विभागाने ‘दिव्यांगांच्या दारी’ या अभियानाचे आयोजन केले होते. त्यावेळी कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकार मुर्खासारखे वागत आहे. केवळ सरकार, ग्राहकांचाच विचार करत आहे. सरकार शेतकऱ्यांचा विचार का करत नाही? मी एनडीएमध्ये असलो तरी, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलेच पाहिजे. भाव वाढले तर तुम्ही हस्तक्षेप करता, मग भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप का करत नाही? असा हल्लाबोल त्यांनी मोदी सरकारवर केला आहे. तसेच कांदा न खाल्ल्यास लोक मरणार आहेत का?, शेतकऱ्यांचे नुकसान तुम्ही का करता? कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याची गरज नव्हती असं देखील कडू यांनी म्हटलं आहे.

दिव्यांगांसाठी सर्वसमावेश धोरण : दिव्यांग बांधवांच्या जीवनातील दु:ख, वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे यावे. दिव्यांगांचे सर्वेक्षण योग्यरितीने होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन देखील कडू यांनी केले आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण आणलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते आदी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. सरकारने माकडचाळे थांबवावेत, राजू शेट्टींचा इशारा; कांदा खरेदीसाठी केली 'ही' मागणी
  2. Onion Farmers Protest : २ लाख मेट्रिक टन कांदे खरेदीच्या निर्णयानंतरही तिढा सुटेना! शेतकऱ्यांसह विरोधी पक्ष आक्रमक
Last Updated :Aug 22, 2023, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.