ETV Bharat / state

Shambhuraj Desai: बाळासाहेबांचा वारसा बाजूला ठेवून उद्धव ठाकरे लोटांगण घालत सिल्वर ओकला गेले-शंभूराज देसाई

author img

By

Published : Apr 12, 2023, 7:55 AM IST

Shambhuraj Desai
मंत्री शंभूराजे देसाईचा घणाघात

काका मला वाचवा म्हणायला तर सिल्व्हर ओकला गेले नाहीत ना? असा सवाल करत मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तर सकाळी मातोश्रीवर स्वाभीमानाच्या बाता मारायच्या आणि संध्याकाळी सिल्वर ओकवर जाऊन लोटांगण घालणाऱ्यांनी मातोश्रीचं नाव धुळीला मिळवले आहे.

बाळासाहेबांचा वारसा बाजूला ठेवून उद्धव ठाकरे लोटांगण घालत सिल्वर ओकला गेले

पुणे: आजपर्यंत देशातील मोठे नेते मातोश्रीवर येते होते, चर्चा व्हायच्या. परंतु आज उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकला लोटांगण घालत गेले. सकाळी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना, शिवसेनेचा मराठी बाणा, स्वाभिमान, बाळासाहेबांचा वारसा याची आठवण करून देणाऱ्या उद्धव ठाकरेंना ही वेळ आल्याची मनाला वेदना झाल्याचे प्रतिक्रिया उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाला अचानक भेट दिली होती. त्यानंतर आता त्या भेटीवर शिंदे गटाकडून टीका केली जात आहे. पुण्यामध्ये ते पत्रकार परिषदेत मंगळवारी बोलत होते.



शंभूराजे देसाई पत्रकार परिषद: भेटी संदर्भात पत्रकार परिषद घेऊन शंभूराजे देसाई याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शंभूराजे देसाई यावेळी म्हणाले की, देशातल्या कुठल्याही मोठ्या चर्चेसाठी मातोश्रीवर अनेकांना यावे लागायचे, पण आज मातोश्रीला सिल्वर ओक जावे लागते. ही वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय राऊत यांनी आणली असे आरोप शंभूराजे देसाई यांनी केला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा एक दरारा होता. शिवसेनेचा स्वाभिमान होता. एकीकडे इतका मोठा दराऱ्याचा वारसा, एकीकडे मातोश्रीवरुन जाऊन सिल्वरव लोटांगण घालण्याचा वारसा या दोघांमधला हा फरक असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे.



आघाडीमध्ये फूट पडण्यास सुरुवात: महाविकास आघाडीमध्ये फूट पडायला सुरुवात झालेली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे एकीकडे संजय राऊत जेपीसी मागणी करतात अदानी प्रकरणात तर दुसरीकडे शरद पवार उच्च न्यायालयाच्या चौकशीची मागणी करतात. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेमध्ये मार्क, शिक्षण लिहा असे संजय राऊत म्हणतात, तर दुसरीकडे शिक्षणावर बोलू नका असे शरद पवार म्हणतात, त्यामुळे आघाडीमध्ये फूट पडण्यास सुरुवात झाल्याचे ते म्हणाले.



शिवसैनिकाला झाल्या वेदना: उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकला गेल्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा कट्टर शिवसैनिक, त्यांच्या अनुयायी यांना खूप वेदना झाल्या आहेत. लाखो शिवसैनिकांच्या संघर्षाने तयार झालेल्या शिवसेनेला ही वेळ उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय राऊत यांनी आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरेंना मानणाऱ्या त्या प्रत्येक शिवसैनिकाला या वेदना झाल्याचे सुद्धा शंभूराजे देसाई म्हणाले.



काका मला वाचवा: बाळासाहेब ठाकरे असताना युती सरकारचा रिमोट कंट्रोल हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात होता. परंतु महाविकास आघाडीचा रिमोट कंट्रोल हा शरद पवार यांच्याच हातात होता. तो बाळासाहेबांच्या वारसा सांगणाऱ्याने दिला आणि आज त्यांच्यावर तिथे जाऊन लोटांगण घालण्याची वेळ आली. ही वेळ त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आणली आहे. काका मला वाचवा असे म्हणत तर उद्धव ठाकरे गेले नाहीत का? असा प्रश्न आम्हाला पडतो, अशी टीका मंत्री देसाई यांनी केली आहे.



गरजेनुसार माणसांचा वापर: यावेळी बोलताना शंभूराजे देसाई यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्या बाबरी मज्जतीमध्ये शिवसैनिक नव्हते. या विधानावर सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडली माहिती अपुरी आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस आदेश द्यायचे, ते त्यावेळी शिवसैनिक मानायचे. आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत, की बाबरी मज्जिद पाडण्यात शिवसेनेचा वाटा होता. तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे गरजेनुसार माणसांचा वापर करून गरज संपल्यानंतर सोडून देतात. त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. अयोध्या दौरांमध्ये आमच्यासोबत कोणी गुंड नव्हते. जे आदित्य ठाकरे सोबत होते तेच आमच्या सोबत होते. त्यामुळे ते त्यांना गुंड म्हणतात, अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी अयोध्या दौऱ्यातील झालेल्या टीकेवर दिलेली आहे.



मंत्री मंडळाचा विस्तार: मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होण्याची शक्यता मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लवकर करू असे सांगितल्याचे त्यांनी माहिती दिली आहे. बच्चू कडू 2024 मध्ये मंत्री मंडळाचा विस्तार होईल असे म्हणतात. त्यावर ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आमच्या संपर्कात अनेक राजकीय लोक आहेत. वेळ आल्यानंतर ते सुद्धा कळेल. भाजप शिवसेना युतीवर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, की आम्ही लोकसभा एकत्र लढणार आहोत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. अडीच वर्षांमध्ये युतीमध्ये थोडीशी फूट पडली होती. ती आम्ही पुन्हा घट्ट बांधली आहे. आमच्या जागा वाटपाचा निर्णय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, हे योग्य वेळी त्या त्या वेळेस घेतील आणि आम्ही धनुष्यबाणावरच लढणार असल्याचे, मंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.



हेही वाचा: Uddhav Thackeray Met Sharad Pawar उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट चर्चा मात्र गुलदस्त्यातच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.