ETV Bharat / state

Legislative Council Election : वृत्तवाहिन्यांवरील ब्रेकिंग न्यूज बाबत मंत्री धनंजय मुंडेंचे भाष्य

author img

By

Published : Jun 18, 2022, 10:39 PM IST

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

विधान परिषदेसाठी परवा मतदान ( voting For Legislative Council ) आहे त्या अनुषंगाने आत्ता राष्ट्रवादी पक्षाची बैठक ( NCP Meeting In Mumbai ) सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीचा ( Result of Rajya Sabha elections ) निकाल काय लागला हे सर्वांना माहीत आहे.

बारामती - विधान परिषदेसाठी परवा मतदान ( voting For Legislative Council ) आहे त्या अनुषंगाने आत्ता राष्ट्रवादी पक्षाची बैठक ( NCP Meeting In Mumbai) सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीचा ( Result of Rajya Sabha elections ) निकाल काय लागला हे सर्वांना माहीत आहे. अशावेळी वृत्तवाहिन्यांना बातम्या हव्या असतात. मामा आणि मी बारामतीत आहे. मुंबईत माहित नाही का? कदाचित आत्ता पत्रकारांना माहित झाले असेल की, राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीला दोन मंत्री हजर नाहीत ( NCP meeting ) अशी ब्रेकिंग दाखवली जाईल. मात्र, काही वेळाने दाखवले जाईल की, धनंजय मुंडे आणि दत्तात्रय भरणे पक्षाच्या बैठकीला उपस्थित नाहीत. असे म्हणत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वृत्तवाहिन्यांची फिरकी घेतली.

मुंडे आज बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. वास्तविक या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार होते मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ते उपस्थित राहू शकले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची महत्वपूर्ण बैठक असतानाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार हे दोन्ही मंत्री मुंबईतील बैठकीस उपस्थित न राहता त्यांनी बारामतीतील कार्यक्रमाला हजेरी लावली. याच वेळी मुंबईतील राष्ट्रवादी पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीला दोन मंत्री उपस्थित नाहीत अशी वृत्तवाहिन्यामध्ये ब्रेकिंग केली जाईल. कारण मागील आठवड्यात राज्यसभेचा लागलेला निकाल तसेच परवा विधान परिषद मतदानाच्या अनुषंगाने होत असलेली महत्त्वपूर्ण बैठकीला दोन मंत्री अनुपस्थित अशा बातम्या वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या जातील असेही ते म्हणाले.

हेही वचा - Agneepath Scheme Protest : 'अग्निपथ'चे लोन महाराष्ट्रात, सोलापूर रेल्वे स्थानकावर तरुणांचे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.