ETV Bharat / state

रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा मृत्यू, चेंगराचेंगरीने नव्हे 'या' कारणाने मृत्यू झाल्याचा पोलिसांचा दावा

author img

By

Published : Oct 23, 2022, 6:27 AM IST

चेंगराचेंगरी
चेंगराचेंगरी

बांधकाम मजूर म्हणून काम करणारा आणि क्षयरोगाने ग्रस्त असलेला ( TB patient death at rail station ) हा प्रवासी दोन मित्रांसह पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये ( Pune Danapur Express ) चढणार होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. रात्री 9 वाजता, सुरक्षा गेटमधून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मध्ये प्रवेश करत असताना, साजन मांझी यांना खोकला येऊ लागला आणि ते प्लॅटफॉर्मच्या बाहेर कोसळले

पुणे : दिवाळीत घरी परतण्यासाठी रेल्वे स्टेशनवर ( Pune railway station death ) प्रवाशांची एकच गर्दी उसळल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत शनिवारी सायंकाळी उशिरा पुणे रेल्वे स्थानकावर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा आजारपणात कोसळून मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. दुसरीकडे प्रवाशाचा मृत्यू चेंगराचेंगरीत झाल्याची चर्चा आहे.

बांधकाम मजूर म्हणून काम करणारा आणि क्षयरोगाने ग्रस्त असलेला ( TB patient death at rail station ) हा प्रवासी दोन मित्रांसह पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये ( Pune Danapur Express ) चढणार होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. रात्री 9 वाजता, सुरक्षा गेटमधून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मध्ये प्रवेश करत असताना, साजन मांझी यांना खोकला येऊ लागला आणि ते प्लॅटफॉर्मच्या बाहेर कोसळले. त्यांना ससून सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर ( Inspector Pramod Khopikar ) यांनी सांगितले.

२०० मीटर अंतरावर प्रवाशाचा मृत्यू- दिवाळीत प्रवाशांच्या गर्दीमुळे स्टेशनवर चेंगराचेंगरीसारखी ( rumours of a stampede like situation )परिस्थिती निर्माण झालेली अफवा होती, असे खोपीकर यांनी म्हटले. मुख्य फलाटापासून किमान २०० मीटर अंतरावर प्रवाशाचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.