ETV Bharat / state

राज्याला स्थिर सरकार मिळाले - हर्षवर्धन पाटील

author img

By

Published : Nov 23, 2019, 4:49 PM IST

हर्षवर्धन पाटील

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांच्या नेतृत्वाखाली राज्याला स्थिर सरकार मिळाले, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे - राज्यात मागील महिन्यापासून सुरू असलेल्या सत्ता नाट्याने अकल्पनीय वळण घेतले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांच्या नेतृत्वाखाली राज्याला स्थिर सरकार मिळाले, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

राज्याला स्थिर सरकार मिळाले - हर्षवर्धन पाटील


भाजपच्या नेतृत्वाखाली जनतेला स्थिर सरकार मिळावे, असा कौल जनतेने निवडणुकीतच दिला होता. मात्र, ऐनवेळी शिवसेनेने माघार घेतल्याने एक महिना होऊन गेला तरी सरकार स्थापन होऊ शकले नाही. शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे निश्चितच राज्याला एक स्थिर सरकार मिळाले आहे, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा - 'महाराष्ट्रात लोकशाहीचा खून, तिघे मिळून सरकारचा पराभव करणार'
राज्यात अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न यामुळे सरकार स्थापन होने हे जनतेच्याच हिताचे आहे. भविष्यामध्ये नक्की हेच सरकार कायम राहील, असा विश्वास असल्याचेही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Intro:Body:बारामती...
राज्याला एक स्थिर सरकार मिळाले...माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

भाजपच्या नेतृत्वाखाली जनतेला स्थिर सरकार मिळावे. असा कौल जनतेने दिला होता. मात्र एक महिना होऊन गेला तरी सरकार स्थापन होऊ शकले नाही त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे त्यामुळे निश्चितच राज्याला एक स्थिर सरकार मिळाले आहे.. सध्या अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न त्यामुळे सरकार स्थापन होणे हे जनतेच्या हिताचे आहे. आणि हा निर्णय अतिशय योग्य आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये हे सरकार कायम राहील असा मला विश्वास त्यामुळे असल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.