ETV Bharat / state

HSC Exam 2023 : बेस्ट ऑफ लक! मंगळवारपासून बारावीची परीक्षा, 'ही' आहेत ठळक वैशिष्ट्य, वाचा सविस्तर

author img

By

Published : Feb 20, 2023, 9:35 PM IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर तारखेनुसार उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरूवात होत आहे. या परिक्षेसाठी एकूण 14,54,293 विद्यार्थी बसणार आहेत. परिक्षेसाठी राज्यात तब्बल 3,195 मुख्य केंद्रावर परिक्षा होणार आहे.

HSC Exam
बारावी परिक्षा
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी माहिती देताना

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) ची लेखी परीक्षा उद्या 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण 14,57,293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

एकूण परिक्षार्थींची संख्या: बारावीच्या बोर्ड परिक्षसाठी 7,92,780 विद्यार्थी 6,64,441 विद्यार्थीनी आहेत. एकूण 10,388 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3195 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थी संख्या: यंदाच्या या परीक्षेत विज्ञान शाखेतून 6,60,780 विद्यार्थी, कला शाखेत 4,04,762, वाणिज्य शाखेत 3,45,532, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) मध्ये 42,959,आणि टेक्निकल सायन्स (ITI) शाखेत 3261 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

परीक्षेची ठळक वैशिष्टये: फेब्रुवारी-मार्च 2023 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्वीकारण्यात आलेली असून सरल डेटावरून कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी कालपर्यंत आवेदनपत्रे स्वीकारण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2023 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य घरावे.

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती: फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचे वेळापत्रक 30 डिसेंबर रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्यमंडळ व 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

असे असतील नियम: परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परीक्षा केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण मोर्बाइलमध्ये करावयाचे आहे. तसेच संपूर्ण केंद्रपरिसराचे चित्रीकरण करावयाच्या सूचना या परीक्षेपासून संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (स्नर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे.

परिक्षेचा कालवधी: सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही (Hall Ticket ) नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ सत्रात स. 10.30 वाजता व दुपार सत्रात दु. 2.30 वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून सकाळ सत्रात स. 11.00 वाजता तसेच दुपार सत्रात दु. 3.00 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.

दहा मिनिटे वाढवून दिली: परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे. तथापि पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. फेब्रुवारी-मार्च 2023 च्या परीक्षेसाठी प्रथमच लेखी परीक्षेपूर्वी गैरमार्ग प्रकरणी विद्याथ्र्यांसमोर शिक्षा सूचीचे तसेच उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचनांचे वाचन करणेबाबत सर्व माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळामार्फत सूचित करण्यात आलेले आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलत: इ.12 वी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना 10 ऑक्टोबर 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी देण्यात येत आहे. विद्यार्थ्याने कॅलक्युलेटर स्वतःचा आणावयाचा आहे. सदर कॅलक्युलेटर फक्त कॅलक्युलेटर स्वरूपातीलच असावा. मोबाईल मधील अथवा इतर इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅलक्युलेटर वापरता येणार नाही.

कॉपीमुक्त अभियानासाठी विशेष योजना: संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबध्द व सर्व घटक समावेशक असा 'गैरमार्गाशी लढा' या अभियानाचा कृति कार्यक्रम या वर्षी देखील मंडळाने राबविण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकसूत्रीपणा हे तत्व विचारात घेवून याबाबत नियोजन करण्यात आले आहे व त्यानुसार स्थानिक दक्षता समिती व केंद्रस्तर सभा, पालकसभा, विद्यार्थ्यांचे उद्बोधन, इ. द्वारे या अभियानाचा कृति कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल होण्यास व परीक्षेतील गैरप्रकार कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

दक्षता समित्यांची नियुक्ती: परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांच्या परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी व परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडीओ चित्रिकरण इ. उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Shivsena Bhawan : शिवाई ट्रस्ट अन् शिवसेना भवन विरोधात तक्रार, ठाकरेंचे टेन्शन वाढणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.