ETV Bharat / state

Pune Crime News : पत्नीसोबत मित्राचे संबंध पाहून 'त्याने' स्वत:ला संपवले

author img

By

Published : Jan 23, 2023, 3:31 PM IST

मित्राने मित्राच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध ठेवले. मित्राला मानसिक त्रास देऊन मारहाण केल्याने पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यात घडली. याप्रकरणी पत्नी व तिचा प्रियकर यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News
मित्राने केली आत्महत्या

पुणे : पती आणि आरोपी प्रियकर हे दोघेही शाळकरी मित्र आहेत. मित्र असण्याबरोबर पैशांच्या व्यवहारामुळे त्यांचे नेहमी एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. त्यातूनच पत्नीचे पतीच्या मित्राशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यातूनच ही घटना घडली.

पती व्यसनाच्या आहारी : परिणामी पत्नीशी भांडण आणि तणावामुळे पती व्यसनाच्या आहारी गेला. त्यातच प्रेमसंबंधाच्या आड येणाऱ्या पतीला दोघा आरोपींकडून सतत मारहाण होत होती. आत्महत्या करण्याअगोदर संध्याकाळी म्हणजे २० जानेवारीला आपल्याच घरात दोघांना एकत्र पाहून पतीने विचारणा केली असता पत्नीच्या प्रियकराने त्याला शिवीगाळ व मारहाण केली. २१ जानेवारी सकाळी १० वाजता घरी येत आरोपीने मारहाणीची पुन्हा पुनरावृत्ती केली. परिणामी तणावात असलेल्या पतीने आपल्या राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी चॅनलला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. जी. पाटील करीत आहेत.

मृतदेह घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात : आत्महत्येनंतर मृतदेह घेऊन त्याच्या नातेवाईकांनी इंदापूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. घटनेशी संबंधित दोषींवर योग्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल करू, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतरही नातेवाईक आपल्या मागणीवर ठाम राहिले. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा वरील दोन्ही आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.

आत्महत्येची कारणे : गेल्या वर्षभरात राज्यात 28 हजार लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेक कारणांनी पुरुष आणि स्त्रियांनी आपले आयुष्य आत्महत्येच्या विचाराने संपवले आहे. कौटुंबिक अत्याचार, लैंगिक शोषण, सामाजिक अत्याचार, विवाह किंवा प्रेम प्रकरणात फसवणूक, संशय घेणे, अंधश्रद्धा, नोकरी धंद्यातील नैराश्य, वेड लागणे अशी अनेक कारणे आत्महत्या करण्यामागे असतात. तर खोट्या गुन्हा अडकवणे, विनयभंग, लैंगिक छळ, बलात्कार, स्टॉकिंग, वैवाहिक संबंधात पोलीस तक्रार अशा तक्रारींमध्ये पुरुषांनी आयुष्य उध्वस्त होत असल्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुरुषांची संख्या महिलांपेक्षा दुप्पट : एकतर्फी प्रेम किंवा प्रेमातील वियोगामुळे तरुणांनी जास्त आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. वास्तव फाउंडेशनचे संस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्या करण्याची संख्या खूप अधिक होती. अनेक कारणाने आत्महत्या केलेल्या पुरुषांची संख्या महिलांपेक्षा दुप्पट आहे.

हेही वाचा : Jharkhand Crime : हृदयद्रावक ! झोका खेळू म्हणत.. मुलाची हत्या करून आईची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.