ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; काही ठिकाणची वीज गायब

author img

By

Published : Oct 22, 2020, 5:51 PM IST

Updated : Oct 22, 2020, 5:58 PM IST

गेल्या आठवडाभरापासून पिंपरी-चिंचवडसह परिसरात दररोज दुपारच्या सुमारास पाऊस हजेरी लावत आहे. आजदेखील शहरात जोरदार पाऊस कोसळला. सकाळपासून आकाश निरभ्र होते. मात्र, अचानक दुपारच्या सुमारास ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस झाला.

पिंपरी-चिंचवडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुळसाधर पाऊस
पिंपरी-चिंचवडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुळसाधर पाऊस

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवार) दुपारी अचानक जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. सकाळपासून आकाश निरभ्र होते. मात्र, दुपारी अचानक ढग दाटून आले आणि गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. अर्धा तास झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते.

पिंपरी-चिंचवडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस

पिंपरी-चिंचवड शहरात आज दुपारी चारच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. सोबत सोसाट्याचा वारादेखील होता. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडसह परिसरात दररोज दुपारच्या सुमारास पाऊस हजेरी लावत आहे. आजदेखील शहरात जोरदार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील बत्ती गुल झाली असून ढगाळ वातावरणामुळे परिसरात अंधार पसरला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात अचानक पाऊस हजेरी लावून काही मिनिटात पाणीच पाणी करतो आहे. आजदेखील जोरदार पाऊस झाल्यानंतर वातावरण गारवा निर्माण झाला आहे. यामुळे ऐन ऑक्टोबर हिटमध्ये नागरिक थंडा थंडा कुल कुल असा अनुभव घेत आहेत.

हेही वाचा - पुणेकर झाले निवांत; बाजारात मास्क न वापरण्यासह सोशल डिस्टन्सिगंचा फज्जा

Last Updated : Oct 22, 2020, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.