ETV Bharat / state

Pune LokSabha By Elections : पुणे लोकसभा पोटनिवडणूक चंद्रकांत पाटलांनी लढवावी; आमदार रवींद्र धंगेकर यांचा टोला

author img

By

Published : Apr 7, 2023, 8:20 PM IST

Updated : Apr 7, 2023, 8:45 PM IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवावी अशी टीका आमदार रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. भाजपकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळायाला हवी. त्यांना पुण्यातील नागरिकांच्या समस्या माहिती आहेत अशी टीका धंगेकरांनी पाटील यांच्यावर केली.

Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar

आमदार रवींद्र धंगेकर यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी, नुकतच आमदार झालेले आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यावर आमदार धंगेकर म्हणाले की पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. पण, मला अस वाटते की, भाजपकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळावी, असे धंगेकर म्हणाले. पुण्याच्या खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यात लोकसभा पोटनिवडणूकबाबत राजकीय वर्तळात चर्चेला उधान आले आहे. यावर आमदार रविंद्र धंगेकर यांनी भाष्य केले आहे.

भाजपला धडा शिकवणार : आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन 10 दिवस देखील झाले नाही. तरीदेखील पुणे लोकसभा मतदारसंघासाठी राजकीय घौडदौड सुरु आहे. पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक लढवायची का नाही याच निर्णय महाविकास आघाडीमधील नेते मंडळी घेतील. आज भारतीय जनता पक्षाचे देशात दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत राजकारण सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला सर्व कंटाळले आहे. नागरिकांना परिवर्तन पाहिजे आहे. येणाऱ्या काळात जनता महाविकास आघडीला मतदान करुन धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे धंगेकर म्हणाले. त्यांच्या नावाच्या चर्चेबद्दल ते म्हणाले की माझ्या नावाबद्दल चर्चा सुरु आहे. मात्र, मी आत्ताच आमदार झालो आहे. मला पुढे खूप भविष्य आहे. पक्ष जो निर्णय घेईल ते मला मान्य असल्याची प्रतिक्रीया आमदार धंगेकरांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका : कसबा पोटनिवडणुकीत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचार सभेत हू इज धंगेकर अस म्हटले होत. यावर आत्ता धंगेकर म्हणाले की भाजपने पुण्याची लोकसभेसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी द्यावी. कारण ते ज्येष्ठ नेते आहे, ते पुण्याचे पालकमंत्री आहे. त्यांना पुण्याच्या नागरिकांना काय हवे काय नको यांची चांगली जाण आहे. त्यांनी निवडणुक लढवली तर उत्तम होईल अशी बोचरी टीका धंगेकरांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

खासदार होण्याची घाई : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर दोन दिवस लागोपाठ माझ्या सत्काराचे कार्यक्रम होते, मात्र मी ते रद्द केले. इतके मोठ्या नेत्यांचे निधन झाल्यावर ज्याने त्याने आपली संस्कृती दाखवली पाहिजे. भाजपच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना आमदार, खासदार होण्याची खूप घाई झाली आहे. मुक्ता ताई यांच्या निधनानंतर यांनीच बाशिंग बांधल होत. आत्ता खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर देखील यांनीच बाशिंग बांधले आहे असे धंगेरकर म्हणाले.

हेही वाचा - Eknath Shinde Ayodhya Visit : माझ्यामुळे घरात बसणारे लोकं आता घराबाहेर पडले, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

Last Updated :Apr 7, 2023, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.