ETV Bharat / state

Gautami Patil Father Passed Away: गौतमी पाटीलच्या पित्याचं उपचारादरम्यान निधन, पित्यासाठी 'ती' इच्छा राहिली अपूर्ण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 10:51 PM IST

Gautami Patil Father Passed Away
गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन

Gautami Patil Father Passed Away : गौतमी पाटील हिच्या वडिलांचं पुण्यात आज निधन झालंय. त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी ते धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते.

पुणे Gautami Patil Father Passed Away : नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वडिलांचं उपचारादरम्यान आज (सोमवार) निधन झालंय. रवींद्र बाबुराव पाटील, असं गौतमी पाटील हिच्या वडिलांचे नाव आहे. गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात बेवारस स्थितीत आढळले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं होतं. त्यानंतर गौतमी पाटीलने वडिलांची जबाबदारी घेत त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल केलं होतं.


उपचारादरम्यान गौतमी पाटीलच्या वडिलांचा मृत्यू : गौतमीच्या वडिलांच्या दोन्ही किडनी आणि लिव्हर निकामी झाले असल्याचं समोर आलंय. जेव्हा ते बेवारस सापडले, तेव्हा दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्न नव्हतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. बरं झाल्यानंतर गौतमी वडिलांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवणार होती, अशी माहिती समोर आलीय. पण, उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू (Gautami Patil father death) झालाय.

वडिलांच्या उपचारासाठी शक्य तितके प्रयत्न : काही दिवसांपूर्वी गौतमीचे वडील रविंद्र बाबूराव पाटील हे धुळ्यात बेशुद्ध आढळले होते. त्यांना उपचारासाठी हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केलं होतं. खिशात असलेल्या आधार कार्डवरुन त्यांची ओळख पटली होती. ते गौतमी पाटीलचे वडील असल्याचं समोर आलं होतं. ही बातमी गौतमीपर्यंत पोहोचल्यानंतर तिनं वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गौतमी पाटीलनं वडिलांना उपचारासाठी पुण्यात नेलं होतं. यावेळी तिनं वडिलांच्या उपचारासाठी शक्य तितके प्रयत्न करणार असल्याचं देखील म्हटलं होतं.(Gautami Patil news)

गौतमी पाटीलचं सध्या तरूणाईला मोठं वेड : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचं सध्या तरूणाईला मोठं वेड आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेकदा तिच्या कार्यक्रमांत राडा झाल्याचं देखील समोर आलंय. गौतमी लहानची मोठी तिच्या मामांकडे झालीय, असं तिनं माध्यमांना सांगितलं होतं. गौतमी पाटीलच्या वडिलांच्या निधनानं आता तिच्या चाहतेवर्गावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. नुकतीच काही दिवसांपूर्वी तिची वडिलांसोबत भेट झाली होती.

हेही वाचा :

  1. Mangala Bansode on Gautami Patil: गौतमी पाटील प्रकरणावर कलावंत मंगला बनसोडेंचे आवाहन; म्हणाल्या, 'आपल्याच कलाकारांची हेटाळणी..
  2. Gautami Patil News: सबसे कातील गौतमी पाटील; गौतमी पाटीलवरून आमदार आणि खासदार आमने-सामने
  3. Gautami Patil : गौतमी पाटील जोमात; बर्थ डे बॉय कोमात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.